उभ्या टँकरला मागून आलेल्या ट्रकची धडक ; 2 ठार
पनवेल, दि.21 (संजय कदम) ः रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुभाजकाकडील पहिल्या लेनवर उभ्या करून ठेवलेल्या टँकरला पाठीमागून आलेल्या दुसर्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील नांदगाव गावासमोरील उड्डाण पुलावर टी-पॉईंट कडून पळस्पेकडे जाणार्या रस्त्यावर घडली आहे.
नादुरुस्त टँकर क्र.एमएच-46-एफ-4261 वरील चालक नाम्या अख्तर अली याने त्याचा टँकर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुभाजकाकडील पहिल्या लेनवर उभ्या करून ठेवला असताना पाठीमागून ट्रक क्र.एमएच-42-टी-8390 घेवून येणारा चालक राजेंद्र दादा कांबळे (40) याला सदर टँकर न दिसल्याने त्या टँकरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते स्वतः गंभीररित्या जखमी झाले. तसेच टँकर चालक अख्तर अली सुद्धा गंभीररित्या जखमी होवून त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.