तळोजा कारागृहात कोरोना नियंत्रणात ; वर्षभरात 2 कैद्यावर झाले उपचार
पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः देशभर कोरोनाने सर्वांची झोप उडविली असताना राज्यात दिवसागणिक या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढत चालले आहेत. यामुळे आरोग्य प्रशासनाच्या डोकेदुखीत भर पडली आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच कैद्यांनादेखील कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी तळोजा कारागृह प्रशासनाने विशेष काळजी घेतली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना तळोजा कारागृहात कोरोनाला रोखण्यात तळोजा कारागृहात यश मिळाले आहे. वर्षभरात फक्त 2 कैद्यांवर औषध उपचार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांना सौम्य लक्षणे होती.
तळोजा कारागृहांमध्ये आरोपींना भेटीसाठी येणार्या नातेवाईकांना बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव या प्रकारची खबरदारी घेण्यात आली आहे. कारागृह प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. दररोज कारागृहात येणार्या कैद्यांची संख्या लक्षात घेता नवीन कैद्यांपासून कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. नव्या कैदीची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. नवीन आलेल्या कैद्यांवर लक्ष ठेवणे एखाद्या कैद्यांत वेगळी लक्षणे दिसून आल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधून त्या कैद्याची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तळोजा कारागृह अधीक्षक यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱयांनी विशेष लक्ष दिले आहे. यामध्ये कैद्यांना हातपाय धुण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. साबणाने हातपाय धुवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तळोजा कारागृह प्रशासन आणि संयुक्त टीममुळे गेल्या वर्षभरात सौम्य लक्षण असलेले फक्त दोन कैदी तपासणी दरम्यान पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध उपचार करून दोन्हीही कैदी व्यस्थित झाले आहेत. तळोजा कारागृह प्रशासन व टीम वर्कमुळे कारागृहाला कोरोना रोखण्यात आले यश आले आहे.
