पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला अटक; कोव्हिड सेंटर येथे रवानगी
पनवेल दि २४( संजय कदम): कौंटुंबिक वादातून शनिवारी सकाळी पतीने पत्नीच्या डोक्यात मासे कापण्याचा कोयता घालून निर्घृण हत्या केल्याची घटना पनवेल जवळील करंजाडे वसाहतीमध्ये घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी पतीला अटक केली असून तो कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याने त्याला उपचारार्थ तात्काळ कोव्हिड सेंटरमध्ये दाखल कऱण्यात आले आहे व या गुन्ह्यात वापरलेला कोयता पोलिसांनी घटनास्थळाहून ताब्यात घेतला आहे.
करंजाडे वसाहतीमध्ये सेक्टर ४, प्लॉट नं २०, साई सत्यम सोसायटीमधील तिसर्या मजल्यावर बी-305 येथे राहणारे संतोष पाटील (वय ४0) व त्यांची पत्नी संध्या पाटील (वय ३5) हिने तो आजारी असताना औषधोपचार करण्यासाठी डॉक्टरांकडे घेऊन न जाता त्याला गॅलेरीत 4-5 दिवस विलगीकरण करून ठेवले या गोष्टीचा राग संतोष यांनी मनात धरून संध्याशी त्यांनी वाद घालून मासे कापण्यासाठी लागणारा कोयता आपल्या पत्नीच्या डोक्यात घालून तीची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे व ठसे तज्ञ इतर पथक घटना स्थळी पोहचले. अधिक चौकशी प्रकरणी पोलिसांनी पती संतोष पाटील याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पाटील कुटूंबियांना १ मुलगा असल्याचे समजतेय. याप्रकरणी पोलिसांनी संतोषला ताब्यात घेऊन त्याची रवानगीकोव्हिड सेंटरमध्ये केली आहे. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह, सह आयुक्त डॉ. जय जाधव, अप्पर पोलिस आयुक्त डॉ. बी.जी. शेखर पाटील, पोलिस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन भोसले पाटील यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांच्यासह पो.नि. (संजय जोशी), सपोनि धनवडे, सपोनि शिंदे, कोरडे, दळवी, देवळे, म. सपोनि चौधरी, पोलिस उपनिरीक्षक महाडिक व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस अमलदार सपोउपनि कांबळे, पो हवा मेड, पोहवा वाघमारे, पोना पाटील, चौधरी, महेश पाटील, पोशि लोंढे, नागरगोजे आदींच्या पथकाने कारवाई केली आहे. फोटोः इमारत व पोलिस तपास
