लसीकरण हे युद्धपातळी वर घरोघरी जावून करण्यात यावे सत्यमेव जयते ट्रस्ट इंडिया ची मागणी
वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर सत्यमेव जयते ट्रस्ट इंडिया कडून केंद्रीय अरोग्यमंत्रालाय कडे केल्या गेलेल्या १८ वर्षा वरील सर्व लोकाना कोरोना प्रतिबंधनात्मक लस देण्यात यावी, या मागणीला सकारात्मक प्रतिसाद भेटला आहे. आता गरज आहे योग्य नियोजन आणि वेळ न घालवता मोठ्या प्रमाणात लोकांचे लसीकरण करण्याची. ते करताना कुठेही गर्दी होवू नये, लस वाया जावू नये. लसीचा पुरवठा नियमित असावा असे बऱ्याच गोष्टी लक्षात घेवून राज्य सरकारला उपाययोजना करव्या लागतील. ट्रस्ट काही पर्याय सुचवले गेलेत ज्यामुळे लसीकरण नियोजत वेळेत व गर्दी टाळून करता येण सहज शक्य होईल.
तरी आत्ता महाराष्ट्र सरकारने युद्धपातळीवर ही लसीकरण मोहीम राबवावी, त्यासाठी घरोघरी जावून लसीकरण करण्याची मागणी ट्रस्टच्या अध्यक्षा शितल शिवाजीराव मोरे यांनी केली आहे. तसेच ब्रेक द चैन या अंतर्गत हाच पर्याय सर्वसामान्य जनतेसाठी योग्य आणि सोयीचा असल्याचे ठाम मत सरचिटणीस अभिजीत दिलीप सांगळे यांचे आहे. लसीकरण हे मोफतच असाव, त्याचे योग्य नियोजन व यंत्रणा राज्य सरकार ने तातडीने करावे अशी प्रतिक्रिया संस्थापक संजय वासुदेव पवार यांनी दिली.