तारा भाजपतर्फे मोफत सॅनिटायझर फवारणी
पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली तारा गाव बूथ अध्यक्ष जितेंद्र सुरेंद्र पाटील,पनवेल तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष दिनेश विट्ठल पाटील,तारा गाव बूथ उपाध्यक्ष हरेश्वर लक्ष्मण पाटील तसेच तारा गावातील भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी यांच्या वतीने संपूर्ण तारा गाव,कर्नाळा ग्रामपंचायत कार्यालय,गावातील मंदिरे,तारा गाव नवीन वसाहत तसेच युसूफ मेहेरअली हॉस्पिटल पूर्णपणे मोफत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. तारा ग्रामस्थांकडून भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले.