चिरनेरच्या तरुणाला आयपीएल ड्रीम इलेव्हन टीम मध्ये १५ लाखांची लॉटरी लागली
विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई : कोणाचे नशीब कसे खुलतील हे सांगता येत नाही.चिरनेरच्या अशाच एका क्रिकेट वेड्या तरुणाला सध्या सुरू असलेल्या आय पी एल स्पर्धेने धनवान केले आहे.त्याने लावलेल्या ड्रीम इलेव्हन टीमवर त्याला १५ लाखांची लॉटरी लागली आहे.
आयपीएल स्पर्धेत काल झालेल्या दिल्ली कॅपिटल विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू या सामन्यावेळी चिरनेर येथिल संकेत विजय मुंबईकर या क्रिकेट वेड्या तरुणाने स्पर्धेतील नियमानुसार ऑनलाईन ड्रीम इलेव्हन टीम तयार केली होती व ऑनलाईन स्पर्धेत भाग घेतला होता.ड्रीम इलेव्हन टीम मधिल खेळाडूंच्या केल्यानुसार त्यांना पॉईंट्स देण्यात येतात. ज्याने योग्य टीम तयार करून त्यातील खेळाडूंना जास्त पॉईंट मिळाले की त्या स्पर्धकाला १०० रुपयां पासून एक करोड रुपयां पर्यंत बक्षीस दिले जाते. काल चिरनेरच्या संकेत मुंबईकर या तरुणाने तब्बल १५ लाख रुपयांचे बक्षीस मिळविल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.सामान्य घरातील असलेल्या संकेतने या पैशांचा योग्य विनियोग करण्याचा मानस व्यक्त केला आहे.