शिवसेना विभागप्रमुख नितिन पाटील यांनी सामाजिक उपक्रमाद्वारे केला वाढदिवस साजरा
पनवेल, दि.30 (संजय कदम) ः अनेकजण आपापला वाढदिवस आपल्या कुटुंबियांसमवेत किंवा मित्रा समवेत वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करीत असतात. परंतु सध्याच्या कोरोनाच्या काळात शिवसेना विभागप्रमुख नितीन पाटील यांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.
वाढदिवस म्हणजे आपल्या जीवनातील मोठा आनंदाचा दिवस, प्रत्येक जण हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात.परंतु कोरोना पार्श्वभूमीवर वाढदिवस थाटामाटात न करता नितिनदादा पाटील यांनी विविध उपक्रम राबवून साधेपणाने साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोपाडा येथील शिवभोजन केंद्रावर जवळपास तीनशे गरजू गोरगरीबांना मोफत शिवभोजन थाळी वाटप करण्यात आल्या. वाढदिवसाच्यानिमित्ताने प्रत्येकाची भूक मात्र शांत झाली याचेच नितिनदादा पाटील यांना समाधान मिळाले. तर अजिवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ क्टर ,नर्स व कर्मचार्यांना सॅनिटायझर व एन-95 मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच पनवेल तालुका पोलिस स्टेशन व पत्रकार मित्र यांना सॅनिटायझर व एन-95 मास्कचे वाटप करण्यात आले. तर काही गरजूंना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.कोरोना लॉकडाऊनमध्ये जिवनावश्यक वस्तू मिळाल्याने गरजूंच्या चेहर्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.