कोविड सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलांना कोविड ICU विभागात सीसी टीव्ही कॅमेरा बसवण्यात यावे, मा.सौ रुपालीताई शिंदे यांनी मेल द्वारा केली मागणी
पनवेल प्रतिनिधी .तात्काळ कोविड सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलांना कोविड ICU विभागात सीसी टीव्ही कॅमेरा बसवण्याचे आदेश देणे बाबत विनंती.. मा.सौ रुपाली ताई यांनी मेल द्वारा केली मागणी माननीय महोदय,
उपरोक्त विषयाला अनुसरून मी आपणास विनंती करीत आहे की, आपल्या भारत देशामध्ये कोविड 19 चा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. महाराष्ट्र राज्यात तर कोरोना विषाणुने हाहाकार माजविला आहे. तसेच नवी मुंबई, मुंबई या ठिकाणी देखील कोरोनाने हैदोस घातला आहे. तसेच कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांसाठी बेड, रेमडेसिवर, ऑक्सीजन व औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात आपल्या घरच्या व्यक्तींना वाचविण्यासाठी पळापळ धावपळ सुरू आहे. त्यातच सन 2020 पासून कोरोना विषाणूने जिल्ह्यातील अनेक सामान्य गरीब जनतेचे कमरडे मोडलेले असून, हातात पैसे नसल्याने अनेक मध्यमवर्गीय गरीब जनता सरकारी व खाजगी रुग्णालयांची वाट धरीत आहेत. पण याच सरकारी व खाजगी रुग्णालयात कोविड वर उपचार घेत असलेल्या रुग्णाची स्थिती अत्यंत बिकट होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषानुग्रस्त लोकांना रुग्णालयात बेड,ऑक्सीजन, कोविड प्लाझ्मा व रेमडेसिवर उपलब्ध न झाल्याने, अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. तर याच कोविड ICU विभागात कश्या प्रकारे कोरोनावर उपचार करण्यात येतात याची माहिती आता नागरिकांना, हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना असणे गरजेचे आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांना भेटता येत नाही, त्यांना धड पाहता येत नाही. आपला रुग्ण बरा आहे कि कसा आहे याची नातेवाईकांना खबर नसते. 20 – 20 दिवस कोरोनावर उपचार करून तरीदेखील रुग्ण आपला प्राण सोडत आहे, का आणि कश्या मुळे? हे जाणून घेणे अंत्यत गरजेचे आहे. कोविड विभागात उपचार घेत असलेला रुग्ण उपचाराला कशाप्रकारे प्रतिसाद देत आहे? डॉक्टर कश्या पद्धतीने उपचार करीत आहे? कोणत्या रुग्णाला काही त्रास जाणवत आहे का किंवा त्याच्या प्रकृती मध्ये काही बिघाड होत आहे का? हे बाहेर वाट बघणाऱ्या त्या रुग्णांच्या नातेवाईकांना खबर नसते, त्यात रुग्ण जास्त त्यामुळे डॉक्टरांनाही संबंधित नातेवाईकांना रुग्णांच्या परिस्थिती विषयी सांगणे अवघड झाले आहे. अश्यावेळी क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन च्या वतीने आपण सदर कोविड हॉस्पिटलांमध्ये कोविड विभागात सीसी टीव्ही कॅमेरा त्वरित लावावा, जेणेकरून आत चाललेल्या घडामोडी रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर लावलेल्या टीव्हीवर पाहता येतील.. आपला रुग्ण बरा आहे, किंवा त्याची प्रकृती ढासळत चाली आहे, याविषयी नातेवाईकांना माहिती होईल. आपण याकडे गांभीर्याने पहावे, व लवकरात लवकर सदर हॉस्पिटलांना सी सी टीव्ही ची सोय करावी हे आदेश द्यावेत ही आपणांस नम्र विनंती. आपल्या उत्तराची प्रतीक्षा असेन.