मुद्देमालाचे मालकी हक्क दाखवून आपल्या वाहनांची ओळख पटवावी ; तळोजा पोलिसांचे आवाहन
पनवेल, दि.6 (संजय कदम) ः तळोजा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या विविध वाहनांच्या मुद्देमालाचे मालकी हक्कासंदर्भात तळोजा पोलीस ठाण्यात योग्य ती कागदपत्रे सादर करून त्याची ओळख पटवावी असे आवाहन तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि काशिनाथ चव्हाण यांनी केले आहे.
तळोजा पोलीस हद्दीमध्ये भादवी कलम 379, 34 या गुन्ह्यातील आरोपी अमीर अहमद शेख (42 रा.वडाळा मुंबई), दशरथ सिताराम ढमाळ (53 रा.शिवडी, मुंबई), विजय भिमराव भरसाकडे (36 रा.देवीचापाडा, पनवेल) यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील मुद्देमाला व्यतिरिक्त अतिरिक्त मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 3 लाख रुपये किंमतीची एक लाल रंगाची त्यावर सफेद रंगाचा पट्टा असलेली ट्रॉली 4 फूट लांब व 8 फुट रुंद, या ट्रॉलीला 4 टायर, 2 एक्सल तसेच 2 लाख रुपये किंमतीची एक भगव्या रंगाची ट्रॉली त्याचप्रमाणे 3 लाख रुपये किंमतीची एक नारंगी व पांढर्या रंगाची पट्टी असलेली एक ट्रॉली तसेच 2 लाख रुपये किंमतीची चॉकलेटी रंगाची व त्यावर सफेद रंगाच्या पट्ट्या असलेली ट्रॉली. वरील मुद्देमालाचे मालकी हक्काबाबत संबंधित इसमांना तळोजा पोलीस ठाणे संपर्क क्र.022-27412333 तसेच वपोनि काशिनाथ चव्हाण 8108600170, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय नाळे 9821919876, पो.ना.गणेश देवरे 9987335287 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.