सोन्याची बिस्किटे घेवून नोकरी पसार
पनवेल, दि.8 (संजय कदम) ः दुकानातील गाळण्यास दिलेले सोने याची दोन बिस्किटे बनवून सदर दोन बिस्किटे दुकान मालकांना देण्यासाठी परत आला असता मालक कोरोनाने आजारी आहेत. त्यामुळे ती बिस्किटे माझ्याकडे द्या, असे बोलून तेथील नोकराने सदर बिस्किटे स्वतःच्या ताब्यात घेवून त्यानंतर तो पसार झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. सदर दोन बिस्किटांची किंमत जवळपास 10 लाख रुपये इतकी आहे.
शहरातील ज्वेलर्सचे दुकान असलेले मित्तल कोठारी यांनी त्यांच्याकडे 20 ग्रॅम चोख (24 ग्रॅमचे) सोने दोन सोन्याची बिस्किटे बनविण्यासाठी तानाजी मेटकरी यांच्याकडे दिली होती. सदर सोन्याचे दोन नग बिस्किटे बनवून तो ते देण्यासाठी दुकानात आला असता तेथे काम करणारा मुलगा शंभूसिंग चव्हाण याने सदर सोन्याची बिस्किटे स्वतःच्या ताब्यात घेवून ती मालकांना देतो असे सांगून परस्पर स्वतःच्या फायद्यासाठी अन्यायाने विश्वासात घात करून 10 लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या बिस्किटाचा अपहार केला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.