लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे सांगटोली येथे आदिवासींना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप.
पनवेल / प्रतिनिधी : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगटोली येथील आदिवासी नागरिकांना तांदूळ, डाळ, पीठ, मीठ, कांदे – बटाटे, चहा पावडर आदी जीवनश्याक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, आशा की किरण फाउंडेशनचे अध्यक्ष बशीरभाई कुरेशी, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, पत्रकार तथा जनाधर्मा आधारगृहचे सानिप कलोते, शीतल कलोते, पत्रकार रुपाली वाघमारे, पनवेल शहराध्यक्ष अनुराग वाघचौरे, ओमकार महाडिक व रहीस शेख आदी उपस्थित होते.