लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे सुकापूर येथील बालाजी सिम्फोनीमधील सुरक्षारक्षक व सफाई कामगारांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप.
पनवेल / प्रतिनिधी : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुकापूर येथील बालाजी सिम्फोनी येथील सुरक्षारक्षक, सफाई कामगार व लिफ्टमॅन यांना तांदूळ, डाळ, पीठ, मीठ, कांदे – बटाटे, चहा पावडर आदी जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, पनवेल शहराध्यक्ष अनुराग वाघचौरे, ओमकार महाडिक आदी उपस्थित होते.