भंगार माफियांनी केले आपल्या सहकाऱ्यांना गंभीर जखमी
पनवेल दि.23 (वार्ताहर): कटींग झोनमध्ये आणलेला माल सर्व आम्हालाच पाहिजे असे सांगून चार जणांनी मिळून दुसऱ्या भंगारवाल्याला मारून जबर जखमी केल्याती घटना तळोजा औद्योगिक वसाहतीत घडली आहे.
मोहम्मद शकील शमी मोहम्मद शहा (वय-35) याने भिवंडी येथील बॉंबे स्टील कंपनीतील माल खरेदी करून सदरचा माल हा तळोजातळोजा औद्योगिक वसाहतीत कटर झोन मारूती कटर कंपनी प्लॉट नं.-सी-21-बी येथे आणला असताना त्याने त्यातील अर्धा माल आरोपी ईस्तियाक उर्फ कल्लू अदालत शाह (वय-35) याला घेऊन जाण्यासाठी बोलवले असता त्याने त्याच्यासोबत अब्दुल (पूर्ण नाव माहित नाही), अश्पाक(पूर्ण नाव माहित नाही) व खुर्शिद(पूर्ण नाव माहित नाही) यांना तेथे आणून मोहम्मद शाह याला तू येथून निघून जा, सर्व माल मी घेऊन जाईन असे सांगितले. परंतु याला त्याने नकार देताच या चौघांनी मिळून लाकडी बांबू व लोखंडी पाईपने त्याच्या दोन्ही पायाच्या गुडघ्याखाली मारहाण करून फ्रॅक्चर केले व हातापायांवर मारून जखमी केल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.