लग्नाचा तगादा लावणार्या प्रेयसीला केटामाईन इंजेक्शन देवुन खुन करणार्या प्रियकरास पनवेल शहर पोलिसांनी केली अटक
पनवेल, दि.31 (संजय कदम) ः लग्नाचा तगादा लावणार्या प्रेयसीला केटामाईन इंजेक्शन खुन करणार्या प्रियकारास पनवेल शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.
पनवेल शहर पोलीस ठाणे हददीतील नियोजीत विमानतळाच्या जागेत कोल्ही कोपर गांवच्या दत्त मंदिराचे पुढे रस्त्याच्या कडेला 35 ते 40 वर्षे वयाचे अनोळखी महिलीचे प्रेत मिळाल्याने अकस्मात मृत्यू रजि.नं. 63/ 2021, फौजदारी प्रकीया संहीता कलम कलम 174 अन्वये दाखल करण्यात आला होता. सदरचे प्रेत हे महीलेचे असल्याने पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, पोलीस सहआयुक्त डॉ.जय जाधव, पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील व सहा. पोलीस आयुक्त, नितीन भोसले-पाटील यांनी सदर गुन्ह्याचा सखोल तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार चौकशी चालु असताना इसम रमेश शिवराम ठोंबरे, वय 36 वर्षे, धंदा-चालक, रा. नानोशी, ता. पनवेल जि. रायगड यांनी सदर महीलेचे प्रेत ओळखून ते त्यांच्या बहीणीचे असल्याचे सांगुन तिचे मृत्यू बाबत संशय व्यक्त केला. दरम्यान रिक्षाचालक लक्ष्मण नाना गुदरे रा. तुरमाळे यास तुरमाळे गावाजवळील रोडच्या बाजुला मयत महीलेचे आधारकार्ड, पॅनकार्ड, पर्स व कपडे इत्यादी साहीत्य असलेली पिवळया रंगाची प्लास्टीक पिशवी मिळुन आली होती. त्याअनुषंगाने मयताचा भाऊ रमेश ठोंबरे यांस पोलीस ठाण्यात बोलावले. त्याने सदर साहीत्य त्याचे बहीणीचे असल्याचे सांगीतले. तसेच तुरमाळे गावात राहणारा व पटेल हॉस्पीटल, पनवेल येथे वॉर्ड बॉय म्हणुन कामास असणारा चंद्रकांत गायकर नावाच्या इसमाबरोबर संबंध असल्याचे व त्यांचा काही दिवसांपुर्वी फोनवर बोलतांना वाद झाल्याची माहीती दिली. त्याअनुषंगाने चंद्रकांत गायकर यास पोलीस ठाण्यात चौकशीकामी बोलावुन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन सांगीतले की, सदर महीले सोबत त्याचे मागील 6 महीन्यांपासुन प्रेमसंबध होते. तथापि तिला गंभीर आजार होता. तरी देखील ती लग्न करण्याचा आग्रह करून नेहमी वाद घालत होती व सतत धमकी देत होती. त्यामुळे तिच्या त्रासाला कंटाळुन त्याने तिला जीवे ठार मारण्याचे उद्देशाने पुर्व तयारी करून तिला आजारातुन बरे होणेसाठी इंजेक्शन देतो असे सांगुन नियोजित विमानतळाचे जागेत नेवून चार वेगवेगळे इंजेकशन्स् व केटामाईन हे विषारी इंजेक्शन आयव्ही इंट्राकंथट्वारे देवुन जिवे ठार मारले. तिची ओळख पटु नये व गुन्हयामध्ये कोणताही पुरावा मिळु नये म्हणुन तिच्याजवळील मोबाईल व पिशवी फेकुन देवुन निघुन गेला होता. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाणेचे वपोनि अजयकुमार लांडगे व पोनि (गुन्हे) संजय जोशी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल देवळे, सपोनि हुल्गे, पोउपनिरी सुनिल तारमळे, पोहवा रविंद्र राउत,पोहवा वाघमारे, पोशि विवेक पारासुर, पोशि युवराज राऊत, पोशि सुनिल गर्दनमारे, पोना परेश म्हात्रे, पोना विनोद पाटील,पोशि यादवराव पुले, पोना पंकज पवार, पोना गणेश चौधरी, पोशि खेडकर व पोशि भगवान साळुंखे यांनी केली आहे.
