लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जनाधर्मा वृद्धाश्रमाला देण्यात आले बेड.
पनवेल / प्रतिनिधी : राजकीय व उद्योजक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत ७० सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक गरजू नागरिकांना प्रतिष्ठानतर्फे मदत करण्यात आली. आज लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील सांगटोली येथील जनाधर्मा वृद्धाश्रमात महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी व महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्यावतीने बेड भेट देण्यात आले. यावेळी जनाधर्मा आधारगृहाचे रामा धर्मा कलोते, संस्थापक संदिप कलोते, शीतल सनीप कलोते, ओमकार महाडिक आदी उपस्थित होते.