वसई विरार सिफेरर्सना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा देऊन प्राधान्याने लसीकरणाचा २ रा डोस करण्याची ऑल इंडिया सिफेरर्स युनियन”ची मागणी
वसई/वार्ताहर:वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक सिफेरर्स आहेत जे नोकरीसाठी विदेशात जातात.
तसेच सिफेरर्सला जगभरातून फ्रंटलाइन वर्कर्स चा दर्जा दिला गेला आहे. वसई विरार सिफेरर्सना प्राधान्याने लसीकरणाचा २ रा डोस करण्यात यावा. जागतिक पातळीवर अनेक देश आणि शिपिंग कंपन्यांनी “No Vaccination No Job” हे धोरण अवलंबले आहे. या अनूशंगाने दिनांक ०७ जून रोजी आरोग्य मंत्रालय, भारत यांच्या जीआरनुसार आंतरराष्ट्रीय प्रवासी विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी साठी परदेशांत जाणार्यासाठी 2 डोसमधील अंतर या पॉईंट नंबर 2 आणि 3 मध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे. या नमूद केलेल्या वाक्यानूसार आम्ही सिफेरर्स देखील या श्रेणी मध्ये येतात. आता याच अनुषंगाने लसीचा दूसरा डोस यातील अंतर कमी करण्यात आला आहे आता आम्ही भारतीय सिफेरर्स आपणास विनंती करतो की शक्य तितक्या लवकर लसीकरणाचा 2 डोस सुरू करा. व आपल्या कडील सिफेरर्सला याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा अशी मागणी तसेच सिफेरर्स ला पालिकेच्या लसीकरण केंद्रवर कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरणा मध्ये प्राधान्य द्यावे ही अशी विंनती वसई विरार महानगर पालिकेचे आयुक्त गंगाधरण डी यांच्या कडे ऑल इंडिया सिफेरर्स युनियन च्या वतीने करण्यात आली. या वेळी युनियन चे कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे व पालघर जिल्हा अध्यक्ष प्रशांत पाटील उपस्थित होते.