माणगांव तालुक्यातील लोनेरे व गोरेगाव विभागातील रिक्षाचालकांची चांगली उत्तम कामगिरी
दि.१३ जून (सचिन पवार माणगांव रायगड) गोरेगाव लोणेरे रिक्षा संघटनेचे वतीने आज पुन्हा एकदा प्रामाणिकपणा गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये दिसून आला ,
दिनांक १२ जून दुपारच्या दरम्यान लोनेरे ते गोरेगाव दरम्यान रिक्षाचालक आपली रिक्षा घेऊन गोरेगाव च्या दिशेने जात असताना दत्त मंदिर च्या परिसरात त्यांना दोन एलईडी टीव्ही पडलेल्या सापडल्या त्याच वेळी त्यांनी लोनेरे संघटनेचे माझी कार्याध्यक्ष तसेच लोणेरे शिवसेनाप्रमुख जयदास टेंबे याच्याशी संपर्क साधून त्या वस्तू रिक्षेत भरून गोरेगाव पोलीस ठाण्यात आपले सहकारी अजित ढवले आणि योगेश टेंबे यांच्यासोबत जाऊन जमा केल्या,त्याच क्षणी गोरेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक व ठाणे अंमलदार यांनी एलईडी टीव्ही च्या मालकांशी संपर्क करून त्याच्या वस्तू जमा केल्या ,
गोरेगाव पोलिसांनी जयदास टेंबे आणि रिक्षा संघटनेचे लोनेरे व गोरेगाव चे सर्व पदाधिकारी याचे कौतुक केले
तसेच एलईडी मालकांनी लोनेरे गोरेगाव रिक्षा चालकांचे व मालकांचे आभार मानले तसेच रिक्षा चालक मालक संघटना गोरेगाव विभाग व लोणेरे चालक-मालक कल्याणकारी संघटना यांनी यांचे पाठ थोपटून शाबासकी दिली.
मागील महिन्यात सुध्दा एक महिला रिक्षातून लोनेरे गोरेगाव प्रवास करीत असताना तिच्या जवळ असलेली नाकातील नथ तिच्या पासून गहाल झाली होती, परंतु रिक्षा चालक परतीचा प्रवास करीत असताना त्यांच्या निर्दनाश ही बाब दिसून आली असता त्यांनी ताबडतोब आपल्या जवळील असलेली वस्तू श्रीमती पार्वती महादेव शिगवण रा रेपोली याची हरवलेली सोन्याची नथ त्याच्याकडे जमा केली रिक्षा चालक गणेश जाधव रा वडवली यांनी सोन्याची नथ सापडली असता त्यांनी संघटनेच पदाधिकारी याना सांगितले असता त्यांनी त्या महिलांला शोधून त्याच्याकडे त्याची सोन्याची नथ सुपूर्द केली रिक्षाचालक गणेश जाधव याचा प्रामाणिकपणा दाखवून माणुसकीचे दर्शन घडविले ,अश्या प्रकारचे उत्तम कामगिरी करताना रिक्षा वाहक चालक दिसत आहेत.