सोमवार आरती मंडळ आवरे तर्फे मर्दनगड किल्ल्याच्या परिसरात वटवृक्षांचे वृक्षारोपण.
उरण दि 14(विठ्ठल ममताबादे )हवेतील वाढते प्रदूषण, निसर्गाचा होणारा ऱ्हास यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे.यामुळे निसर्गाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीकोनातून सोमवार आरती मंडळ आवरे यांच्या माध्यमातून आवरे येथील मर्दनगड परिसरात वटवृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सोमवार आरती मंडळाचे कौशिक ठाकूर सर,महेश गावंड सर,मधुकर कडू सोनारी,संदिप गावंड सर,विद्याधर गावंड सर,गणेशप्रसाद गावंड सर,गणेश ठाकूर,महेश गावंड,अविनाश ठाकूर,सुनील ठाकूर,शंकर पाटील,करण ठाकूर, सुरेश म्हात्रे,सुधाकर म्हात्रे,परेश गावंड,धीरज ठाकूर, अमेय ठाकूर, प्रित ठाकूर ,परेश गावंड उपस्थित होते.पर्यावरणचे रक्षण करणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.