किराणा दुकानाचे गोदाम फोडून तेलांच्या डब्यांची चोरी
पनवेल, दि.19 (संजय कदम) ः किराणा मालाचे गोडावून फोडून अज्ञात चोरट्यांनी सिलबंद रुची गोडतेलाचे डबे चोरुन नेल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
शोभाचंद मुलचंद गुप्ता (50) यांचे रायगड बाजार पनवेल शिवशंभो इंटरप्रायझेस नावाचे किराणा मालाच्या दुकानाचे गोडावून असून अज्ञात चोरट्यांनी तेथील दोन सिलबंद रुची कंपनीच्या गोडतेलाचे डबे आपसात संगनमत करून रिक्षात टाकून चोरुन नेले आहेत. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.