त्रैलोक्य फाउंडेशन व आरती मंडळाच्या तर्फे वृक्षारोपण
उरण दि 21(विठ्ठल ममताबादे )
रविवार दि.20 जून 2021 रोजी त्रैलोक्य फाउंडेशन (KBP. SSC batch 1992/93) व आरती सेवा मंडळ – आवरे यांच्या संयुक्त विद्यमाने कोमनादेवी परिसराच्या डोंगरावर, वड, पिंपळ , कडुलिंब, गुलमोहर, अशा ऐकून 100 झाडांची लागवड केली.या त्रैलोक्य फाउंडेशन मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन SSC बॅच 1992/92 चे विध्यार्थी, विद्यार्थिनी यांचा सहभाग आहे.
वृक्षारोपणा वेळी त्रैलोक्य फाउंडेशन चे अध्यक्ष नित्यानंद म्हात्रे, आरती सेवा मंडळ अध्यक्ष गणेश प्रसाद गावंड आणि सर्व सदस्य या वृक्षारोपणा साठी हजर होते. निसर्ग संवर्धन, निसर्ग संरक्षणाचा हेतू समोर ठेवून वृक्षारोपण करून ती वृक्ष, झाडे जगविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.