चाईल्ड केअर सामाजिक संस्थेतर्फे आदिवासी वाडीत अन्नधान्य किट, मास्क वाटप.
उरण दि 27(विठ्ठल ममताबादे )चाईल्ड केअर सामाजिक संस्था, उरण रायगड(रजि. )चे मार्गदर्शक विकास कडू यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून क्रीत्येक वर्ष अनेक ठिकाणी गरीब गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, गरीब गरजू लोकांना, आदिवासी वाड्यात, अन्न धान्य तसे जीवनावश्यक वस्तू, मतिमंद मुलाना बुद्धीला चालना मिळणाऱ्या वस्तू वाटप, वृद्धा श्रमात अन्न धान्य, जीवनावश्यक वस्तू, रक्तदान शिबीर, श्रमदान करत आले आहेत.
माकड दोडा हे आदिवासी वाडी चिरनेर पासून 3 कि. मी.अंतरावर असून या आदिवासी वाडीवर चाईल्ड केअर सामाजिक संस्थेतर्फे अन्न धान्य किट, मास्क वाटप करण्यात आले तसेच कोविड काळात समाजसेवा करणाऱ्यांचा मान्यवरांचा कोविड योद्धा प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्यांना
कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये 1)संतोष पवार (समाजसेवक, उरण )
2)प्रवीण पाटील (पत्रकार, भेंडखळ, उरण)
3)विठ्ठल ममताबादे (पत्रकार, उरण )
4)सुदेश पाटील(समाज सेवक, क्रोपोली )
5)राजेंद्र पाटील(शिक्षक -कुंडेगाव )
6)अलंकार वर्तक (रुग्णवाहिका चालक, नागोवठणे )
7)पंकज शर्मा (रिक्षा चालक, कळंबोली )
8)निकिता पाटील (आशा वर्तक सेविका, पागोटे )
9)कौशिक ठाकूर (शिक्षक, आवरे )आदींचा कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रम संस्थेचे संस्थापक विकास कडू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.सदर कार्यक्रमाला संतोष पवार (समाज सेवक ), सुभाष कडू (अभिनेता, पत्रकार ), विवेक पाटील (अध्यक्ष-जनता राजा मंडळ पागोटे ),श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष – सुदेश पाटील,उपाध्यक्ष-हेमंत पवार, संपर्कप्रमुख-ओमकार म्हात्रे,सल्लागार -ऍड
गुरुनाथ भगत हे मान्यवर उपस्थित होते.
तसेच चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष – विकास कडू,मीडिया सल्लागार -विठ्ठल ममताबादे,अध्यक्ष -कुणाल पाटील, कार्याध्यक्ष -विक्रांत कडू, कार्याध्यक्ष -ह्रितिक पाटील, उपाध्यक्ष -मनोज ठाकूर, खजिनदार-हर्षद शिंदे, सहचिटणीस-उद्धव कोळी,सहखजिनदार -आदित्य पारवे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी उरण मधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी आदिवासी बंधु भगिनींना कोरोना विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.कोरोना विषयी जनजागृती केली.तसेच या संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष विकास कडू हे संस्थेच्या माध्यमातून जी सेवा करत आहेत त्यासाठी विकास कडू यांचे सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी विशेष कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास कडू यांनी केले तर आभार प्रदर्शन कु उद्धव कोळी यांनी केले.