नाविकांना लोकल ट्रेन ने प्रवास करू द्या, ॲाल इंडिया सिफेरर्स यूनियन चे मुख्यमंत्र्यांकडे साकडे
पनवेल/प्रतिनिधी : लोकल ट्रेन ने प्रवास करता यावा अशी मागणी ऑल इंडिया सिफेरर्स यूनियन कडून करण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरातील सिफेरर्स गेली दीड वर्षापासून घरी बसून आहेत. कोविड बाबतचे जागतिक पातळीवरील निर्बंध शिथिल झाल्यामुळे साईन इन आणि साईन ऑफ ची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सिफेरर्स ला शिपिंग कंपनी मध्ये जाता येण्यासाठी सोयीचा पर्याय म्हणजे लोकल प्रवास आहे.
फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून सिफेरर्सला सगळ्या सोयीसुविधा मध्ये प्राधान्य दिले जाते. तोच नियम लोकल प्रवासत सुद्धा लागू करावा. तसेच बऱ्याच सिफेरर्सचे लसीकरण सुद्धा झालेले आहे. नोकरिनिमित्त त्यांना शिपिंग कार्यालयात भेटी देता याव्या. योग्य ती ओळखपत्र किंवा कागदपत्र तपासून सिफेरर्सला लोकल ट्रेन प्रवासाची मुभा देण्यात यावी, भारतीय सिफेरर्सने लसीकरण अभावी भरपूर नोकऱ्या आधीच गामावल्यात. आत्ता लसीकरण झाले असून सुद्धा वेळे वर शिपिंग कार्यालयात न हजार राहिल्याने नोकऱ्या भेटत नाहीत हे अत्यंत अन्यायकारक असून त्यावर त्वरित मार्ग काढावा अशी विनंती यूनियन अध्यक्ष संजय वासुदेव पवार, कार्र्याध्यक्ष अभिजीत सांगळे आणि खजिनदार शितल मोरे यांनी यूनियन मार्फत केली आहे.