नियमांचे उल्लंघन केल्याने माणगाव येथील चार दुकाने सील
प्रतिनिधी / सचिन पवार माणगांव रायगड: माणगाव शहरासह तालुक्यात दररोज कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे.या महामारीला रोखण्यासाठी शासनाने काही नियम घातले आहेत,मात्र शहरातील काही व्यापारी नियमांचे पालन करीत नसल्याचे समजल्यानंतर माणगाव नगर पंचायतीने धडक कारवाई करत ,४ दुकाने सील केली.तर काही दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्यासह मंगेश पाटील ,रामदास पवार व इतर कर्मचाऱ्यांनी माणगाव शहरात फिरून ही कारवाई केली,,यावेळी जुन्या बस स्थानकाजवळ श्री जसोल किराणा दुकान,फळ विक्रेते,महामार्गावरील टपऱ्या,नाकोडा स्टील आदी दुकाने शासनाच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
कोरोना आटोक्यात येत नसताना माणगाव शहरात जत्रेसारखी गर्दी दररोज पाहायला मिळत आहे.कोरोनाचे संक्रमण सुरू झाल्यापासून दररोज ४०ते६० कोरोणाग्रस्त रुग्ण माणगाव तालुक्यात सापडत आहेत,दुसऱ्या लाटेत आत्तापर्यंत ९९ जणांचे जीव गेले आहेत. पोलिस व नगरपंच्यतिने दिलेल्या आदेशाचे काही व्यापारी पालन करतात .पण काहीजण नियमांचे उल्लंघन करून,दुकानात जास्त गर्दी करून कोरोनाला निमंत्रण देत असल्याचे आढळून आले.
अश्या दुकानांवर माणगाव नगरपंच्यातीने धडक कारवाई करत ४ ,दुकाने सील करण्यात आली.तर काही दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.