खारघर वसाहती जवळ वृद्ध महिलेचे दागिने लुटले
पनवेल दि.30 (संजय कदम): एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन खेचून दोन अज्ञात इसम पसार झाल्याची घटना खारघर वसाहतीत घडली आहे.
शैलजा शिंदे (वय-71, रा.-से.-15 खारघर) या सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जात असताना स्पॅगेटी बस स्टॉप शेजारी सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या एका तरूणाने व्यायाम करण्याचा बहाणा करून तो त्यांच्या मागे आला व त्याने संधी साधून त्यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची 102 मण्यांची सोन्याची चेन खेचून तो त्याच्या साथीदाराच्या मोटारसायकलीवरून पसार झाला. याबाबतची तक्रार खारघर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.