पर्यटकांना देवकुंड धबधब्यावर नेले फिरायला 9 जनावर गुन्हे दाखल
सचिन पवार माणगांव: कोरोनाच्या पाश्वभूमीवर देवकुंड धबधबा परिसरात मनाई आदेश असताना ही ५० ते १०० पर्यटकांना फिरायला घेऊन जाणाऱ्या ९ जनावर माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबतजी फिर्याद माणगांव पोलीस ठाण्याचे शिपाई श्याम सुंदर शिंदे यांनी दिली आहे, माणगांव तालुक्यातील पाटनुस गांवच्या हद्दीत असलेला देवकुंड धबधबा पर्यटकांना सादर घालतोय ,मात्र कोरोनाच्या पाश्व भूमीवर देवकुंड धबधब्यावर व आजूबाजूच्या 1 किमी परिसरात 21 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत प्रतिबंधत्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
असे असताना शनिवारी दुपारी ठीक 3 जुलै रोजी दुपारी 1 ते 3,30 वाजण्याच्या सुमारास बुकिंग घेऊन देवकुंड धबधबा परिसरात फिरण्यासाठी आणण्यात आले होते 50 ते 100 प्रवासी पर्यटकांना फिरायला आणून नियमांचं उल्लंघन करून आदेशच पालन केले नाही ही बाब निर्दनाश येतात पर्यटकांची बुकिंग घेणाऱ्या 9 जनाविरोधात माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
यावेळेस भा द वि कलम 186,269,270,आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 (१) म पो का क 37 (1)(3)135 सह साथीचे रोग अधिनियम1897 चे 2,3,4,महाराष्ट्र कोविड 19 विनियम 11 अनव्ये घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडेकर याच्या मार्गदर्शनखाली पोलीस हवालदार वडते हे करीत आहेत.