स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी केली कोरोनावर मात
पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी कोरोनावर मात केली आहे.गेल्या 23 दिवसापासून पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोरोना झाल्याचे समजताच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेवून विचारपूस केली. त्याचप्रमाणे पनवेलचे आ.प्रशांत ठाकूर यांनी सुद्धा त्यांच्या तब्येतीची वेळोवेळी माहिती घेतली होती. तसेच अनेक राजकीय पक्षातील पदाधिकार्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सातत्याने त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांच्या उपचाराबद्दल वारंवार माहिती घेवून धीर दिल्याने साळुंखे कुटुंबियांनी या सर्वांचे आभार मानून येत्या 2 ते 3 दिवसात महेश साळुंखे पुन्हा सामाजिक क्षेत्रात कार्यरत होताना दिसतील, असेही त्यांनी सांगितले.