स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा
पनवेल दि.09 (संजय कदम)- स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांचा वाढदिवस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पनवेलसह वडघर, करंजाडे व जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा केला. यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शालेयपयोगी वस्तूंचे वाटप, वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांना फळे वाटप करण्यात आले. यानिमित्ताने त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष संसारे यांच्यासह आ. प्रशांत ठाकूर, मुंबई बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत आदींनी त्यांना भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. या वाढदिवसाचे औचित्य साधून लवकरच पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आगामी पनवेल महानगरपालिका निवडणूक तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकीबाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी यावेळी सांगितले.