वसई येथील नया सवेरा नशामुक्ती केंद्रात राजे प्रतिष्ठानचे बशीरभाई कुरेशी यांचे मार्गदर्शन. नशामुक्तीसाठी राजे प्रतिष्ठान पुढाकार घेणार.
वसई / प्रतिनिधी : वसई येथील नया सवेरा फाउंडेशन नशामुक्ती केंद्रामध्ये आशा की किरण फाउंडेशनचे अध्यक्ष तथा राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष व राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हाध्यक्ष केवल महाडिक यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी बशीरभाई कुरेशी यांनी नशामुक्ती केंद्रात उपचार घेत असलेल्या मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की तुम्ही आम्ही सर्व तरुण मंडळी देशाचे उद्याचे भविष्य आहोत आपले अर्धे आयुष्य नशा करण्यासाठी खर्ची न घालता इथे योग्य उपचार घेऊन इथून बाहेर पडल्यावर एक यशस्वी व्यक्ती बनण्यासाठी प्रयत्न करा व आपल्या आई वडिलांना गर्व होईल असे चांगले काम करा. आज संपूर्ण महाराष्ट्रात तरुण – तरुणी यांचे नशा करण्याचे प्रमाण वाढले आहे यामधूनच मग नशेसाठी पैसे मिळत नसल्याने चोरी करणे, मारामारी करणे, घरच्यांना मारहाण करणे किंवा एखादे क्राईम करणे अशा गोष्टी घडत असतात त्यामुळे तुम्ही नशामुक्ती केंद्रात आल्यानंतर आपली नशा कशी लवकरात लवकर सुटेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे बशीरभाई यांनी सांगितले तसेच आम्ही राजे प्रतिष्ठान मार्फत लवकरच नशामुक्ती अभियानांतर्गत विविध कार्यक्रम राबवणार असून आज माझ्या छत्रपतीच्या भूमीत राहणारा बहुतांश तरुणवर्ग हा व्यसनाच्या आहारी गेलेला आहे त्यामुळे त्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर योग्य पद्धतीने कसे उभे करता येईल यासाठी विविध कार्यक्रम आशा की किरण फाउंडेशन व राजे प्रतिष्ठान मार्फत राबविले जाणार असल्याची माहिती यावेळी बशीरभाई कुरेशी यांनी दिली.