पनवेल शिवसेनेकडून पुरग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः नुकत्याच आलेल्या महापुराचा फटका कोकणतील खेड शहराला बसला असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणाच्या रहिवाशांचे नुकसान झाले होते. त्यांना मदतीचा हात म्हणून पनवेल शिवसेनेकडून आर्थिक मदत देण्यात आली.
पनवेल शिवसेना विभागप्रमुख सुजन मुसलोंडकर यांनी खेड शहरातील अनेक कुटुंबियांतील लोकांना मदतीचा हात दिला. यावेळी त्यांना शहरातील मंजिरी काणे यांच्या घराची पडझड झाल्याचे कळताच त्यांनी त्या ठिकाणी जावून आर्थिक मदत केली. तसेच याबाबत शिवसेना आ.योगेश कदम यांची भेट घेवून काणे कुटुंबियांची व्यथा त्यांच्यासमोर मांडली. यावेळी आ.योगेश कदम यांनी या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे