केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्या १७ ऑगस्ट रोजी रायगड व ठाणे जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई, दि. १६ ऑगस्ट – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राज्यात भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे. रायगडात १७ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे जन आशीर्वाद यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. यावेळी विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर उपस्थित राहणार आहे. भाजपच्या विविध योजनांची माहिती जनतेला देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी या जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.उद्या ही यात्रा रायगड व ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आली आहे.
अलिबाग येथील शासकीय विश्रामगृह येथे सकाळी ९ वाजता मंत्री केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची पत्रकार परिषदे होणार आहे. यावेळी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर १० वाजता मच्छीमार, प्रकल्पग्रस्त यांची भेट होणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, यांची जन आशीर्वाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. आहेत. चरी येथे प्रकल्पगस्तांचा मेळावा होणार आहे. त्यानंतर
पेझारी चेकपोस्ट, वाशी नाका जन आशीर्वाद यात्रा होणार आहेत. तसेच दुपारी १२. ४५ वाजता पेण येथील वैकुंठ निवास येथील आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी मुर्तीकारांची भेट होणार आहे व तेथे बुथ अभियानाची बैठक होणार आहेत. दुपारी २.४० वा. शिरढोण, पळस्पे येथे जन आशीर्वाद यात्रा होणार आहे.
सायंकाळी ४.१५ वा.जासई हुतात्मा पुतळा येथील लाभार्थी यांची भेट घेणार असून सायंकाळी ४.४५ वाजता जासई येथे केंद्रिय मंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रा होणार आहे. तसेच, सायंकाळी ५.३० वा.नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालय येथील प्रकल्पग्रस्तांच्या बैठक होणार आहे. आहे. सायंकाळी ६ वा.गायमुख चौक, पुनम टॉवर व सिरवने, डी.वाय.पाटील येथील येथे जन आशीर्वाद होणार आहे. तसेच, तुर्भे सायंकाळी ६.४५ वा. येथे प्रकल्पग्रस्तांची भेट घेणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले आहे.
दरेकर उद्या सायंकाळी ७ वाजता आय.सी.एल. स्कुल, माथाडी भवन येथे जन आशीर्वाद होणार आहे. असून सायंकाळी ७.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथे माथाडी व व्यापा-यांची भेट होईल. त्यानंतर सांयकाळी ७.५० वा. कलास उद्यान, तीन टाकी, महापे ब्रीज, घनसोली नाका, तळवळी येथे जन आशीर्वाद यात्रा होणार आहे. त्यानंतर रात्री ८.४५ वा. रबाळे येथे स्थानिक मच्छिमारांची भेट होणार आहे. त्यानंतर रात्री ९ वा. दिवा सर्कल, ऐरोली सेक्टर, दिघा तलाव येथे जन आशीर्वाद यात्रा होणार आहे. तर जन आशीर्वाद यात्रेचा समारोप रात्री ९.३५ वा. भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री गणेश नाईक यांच्या कोपरखैरणे येथील क्रिस्टल हाऊस येथे हाणार आहे.