क्षत्रिय मराठा परिवारातर्फे रक्तदान.
उरण दि 16(विठ्ठल ममताबादे ) 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त क्षत्रिय मराठा परिवारा तर्फे जेष्ठ नागरिक संघ पनवेल शहर सभागृह येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करुन अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सर्वोतोपरी सहकार्य करून संघटनात्मक कार्य करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. या रक्तदान शिबीरामध्ये पनवेल परीसरातील नागरीकांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि क्षत्रिय मराठा परीवाराच्या अनेक पदाधिकारी यांनी या शिबीरात रक्तदान करून शिवकार्य केले. यावेळी महिला पदाधिकारी यांनीही रक्तदान करून एक आदर्श निर्माण केला. यावेळी रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करून भेटवस्तू देण्यात आली आणि आलेल्या सर्व मान्यरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मार्गदर्शक संस्थापक बापूसाहेब पाटील,महाराष्ट्र प्रदेश प्रमुख- राहुल भाऊ मोरे,प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदेश महिला प्रमुख मनीषाताई चोणकर, महाराष्ट्र प्रदेश डॉक्टर समिती प्रमुख डॉ. विक्रम पाटील,संयोजक महाराष्ट्र उमेश साळुंखे,कार्यक्रम संयोजक – नवी मुंबई प्रभारी विजय जाधव,विशेष सहकार्य नवी मुंबई डॉक्टर समिती प्रमुख डॉ शितल सोमवंशी,पनवेल तालुका प्रमुख प्रसाद पंडित, पनवेल तालुका महिला प्रमुख अर्चना जाधव,पनवेल शहर युवा प्रमुख अजय पवार,पनवेल शहर महिला प्रमुख आश्वीनी सावंत,पनवेल तालुका उपप्रमुख संजय जाधव,पनवेल शहर उपप्रमुख सुशांत शेळके,पनवेल शहर महिला उपप्रमुख प्राजक्ता नलावडे, हॉटेल व्यावसायिक समिती प्रमुख-महेश लोहोटे,सोशल मीडिया आणि संपर्क प्रमुख महाराष्ट्र-रमेश जाईगडे,कोकण विभाग संघटक-योगेश लोहाटे,कोकण विभाग संपर्क प्रमुख-गणेश सुतार,रायगड जिल्हा डॉक्टर समिती कार्याध्यक्ष-वैभव बैलकर,ठाणे जिल्हा प्रमुख-अरुण धनवे,ठाणे शहर महिला प्रमुख-अंजना गरुड,मुंबई संपर्क प्रमुख-बाबाजी मुरादे, ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख-नितीनराज चव्हाण, भांडूप, मुंबई उपप्रमुख-बबन आमले,नेरूळ शहर प्रमुख-प्रशांत सत्रे,उरण तालुका महिला प्रमुख-भाग्यश्री शेळके आदी पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते.

