सामाजिक कार्यकर्ते रवीशेठ पाटील व राजू मुंबईकर कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित.
उरण दि १६(विठ्ठल ममताबादे )दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी मिमिक्री आर्टिस्ट असोशिएशन मुंबई ,मराठी व्यावसायिक वाद्यवृंद संघ,लावणी कलावंत महासंघ,संगीत एकता कला व सामाजिक संस्था आणि संतोष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरिक भवन, सेक्टर १० ,नेरूळ ,नवी मुंबई येथे
दिनांक १५ ऑगष्ट २०२१ सायंकाळी ०५ वाजता आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते हास्यसम्राट जॉनी लिव्हर यांच्या हस्ते रविशेठ पाटील (संस्थापक अध्यक्ष श्री साई देवस्थान, साई नगर, वहाळ) आणि राजू मुंबईकर(संस्थापक :- केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्था वेश्वी)या सामाजिक कार्यकर्त्यांना कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
सामाजिक क्षेत्रातील योगदान,कोरोना काळात कलाकारांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार विविध मान्यवरांना देण्यात आला.कोरोनाच्या प्रादुर्भावा मुळे कार्यक्रमात अगदी मोजक्याच व्यक्तींना प्रवेश देण्यात आला होता.यावेळी मिमिक्री आर्टिस्ट असोशिएशन मुंबई ,मराठी व्यावसायिक वाद्यवृंद संघ,लावणी कलावंत महासंघ,संगीत एकता कला व सामाजिक संस्था आणि संतोष फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
समाजासाठी, गोर गरिबांसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या, समाजासाठी निरपेक्ष भावनेने कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते रवीशेठ पाटील व राजू मुंबईकर यांना कोविड योद्धा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.