स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन घारापुरी बेटावर ग्रामपंचायतीचा वतीने नेव्हीच्या अधिका-या सोबत उत्साहात साजरा..
उरण दि १६(विठ्ठल ममताबादे )१५ ऑगस्ट भारताचा ७५ वा वर्धापन दिनानिमित्त घारापुरी बेटावर आम्हांला भारताचा तिरंगा झेंडा फडकावचा आहे.अशी विचारना ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकुर यांच्याकडे नेव्हीचे अधिका-याकडुन करण्यात आली होती.त्यामुळे ग्रामपंचायतीचे वतीने भारताचा ७५ वा वर्धापन दिन नेव्हीच्या अधिका-यांचा सन्मान करीत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. नेव्ही,आर्मी,मिल्ट्री चे जवान अहोरात्र देशाची सेवा करीत असतात. त्यामुळे सर्व देश सुरक्षित आहे.त्यांच्या ह्या देशसेवेबद्दल जवानांचा सन्मान करता यावा म्हणून ग्रामपंचायत घारापुरी चे वतीने कोस्ट गार्डचे व नेव्हीच्या अधिका-यांचे उपस्थितीत स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या वेळी पदाधिका-यांकडुन उपस्थितांना समुद्र सुरक्षा आणि १५ ऑगस्टचे महत्व सांगण्यात आले.
यावेळी कोस्टगार्ड नवीमुंबई चे प्रमुख कमांडर अभिषेक गांगुली, नेव्ही चे कमांडर दिनेश जाधव तसेच त्यांच्या सहकारी यांनी मार्गदर्शन केले.ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकुर, उपसरपंच सचिन म्हात्रे, सदस्य भरत पाटील,मंगेश आवटे, सदस्या मीना भोईर,सुभद्रा शेवेकर,शुभांगी मायने,राजिप मराठी शाळेचे मुख्याध्यापक म्हात्रे सर,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सोमेश्वर भोईर तसेच गावातील जेष्ठ नागरिक, पदाधिकारी,महिला पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बेटावर पहिल्यादांच इंडियन नेव्हीच्या अधिका-यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाल्याने सर्व स्तरातुन या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.