रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद.
उरण दि 19(विठ्ठल ममताबादे )टायगर ग्रुप उरण तालुक्याचे अध्यक्ष आकाश पांडुरंग जोशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत दि 19/8/2021 रोजी सकाळी 9 ते दुपारी 5 या वेळेत बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल (विमला तलावाजवळ )उरण शहर येथे आकाश जोशी व मित्र परिवार तर्फे व महात्मा गांधी ब्लड बँक ठाणे यांच्या सहकार्याने रक्तगट चाचणी व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराला टायगर ग्रुपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भैया साहेब बडंगर,रायगड जिल्हाध्यक्ष -निलेश भाऊ चव्हाण, नवी मुंबई उपाध्यक्ष -संतोष बंडगर, पनवेल तालुका अध्यक्ष -शंकर जाधव, नवी मुंबई कार्याध्यक्ष -संजय अण्णा,पनवेल तालुका संपर्क प्रमुख -गुरुनाथ पाटील,पनवेल शहर अध्यक्ष-स्वप्निल जाधव, उपाध्यक्ष पनवेल शहर -गणेश खटपे,विकी पाटील सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विकी पाटील, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील,चंदन महाराज आदी टायगर ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी उरण तालुका टायगर ग्रुपचे अध्यक्ष आकाश जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या रक्तदान शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकूण 30 हुन अधिक रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले. अनेकांनी आपले रक्तगट सुद्धा चेक करून घेतले. सदर रक्त गट चाचणी व रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी आकाश जोशी व मित्र परिवाराने विशेष मेहनत घेतली.