मा उपमहापौर विक्रांत पाटील यांनी यांनी त्वरित ड्रेनेज चे झाकण बदलून घेतले
पनवेल /प्रतिनिधी:प्रभाग क्र १८ मधील बिरमोळे हॉस्पिटल लगत च्या रोड वर रिद्धी रीगल सोसायटी समोरील ड्रेनेज चे चाकण पूर्णपणे तूटले आहे असे काही दक्ष नागरिकांच्या निदर्शनास आले.ह्या तुटलेल्या ड्रेनेज झाकणाच्या विषयी माहिती नागरिकांनी त्वरित कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांना दिली.रस्त्यावरील ज्येष्ठ नागरिक,महिला आणि लहान मुलांची येजा जास्त असल्यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.विषयाचे गांभीर्य लक्ष्यात घेत नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्वरित महापालिकेला पत्र दिले व अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरशी बोलून त्वरित ड्रेनेजचे झाकण बदलून घेण्यास सांगितले.
काँट्रॅक्टरने त्वरित नवीन झाकण आणून बसवले.नगरसेवक विक्रांत पाटील प्रभागातील समस्या तत्परतेने सोडवतात याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.