पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे पूरग्रस्तांना अन्नधान्याची मदत.
पनवेल / प्रतिनिधी (विशाल सावंत) : साखर सुतारवाडी ….सह्याद्रीच्या कुशीत वसलेले ,निसर्गाचे वरदान लाभलेले छोटसे पण टुमदार गाव . गाव कसले ३०-३५ घरांची वाडीचा ती . पोलादपूर तालुक्याच्या ठिकाणापासून १५ ते २० किमीच्या अंतरावर महाबळेश्वर मार्गावर हे गाव आहे . २१ जुलै ला जी ढगफुटी झाली ती ढगफुटी भागात झाली की काय असा प्रश्न पडतो . गावाला लागूनच सह्याद्रीच्या डोंगर रांगा असल्याने गावातून डोंगरावरून येणारे झऱ्याचे पाणी वाहते . कोणाला स्वप्नात देखील वाटले नसावे तसे त्या रात्रीत घडले . रात्री ८ ते ८.३० च्या दरम्यान या गावातील लोक जेवायला बसले होते . लहान मुले खेळण्यात व्यस्त असतील. त्याच दरम्यान पाण्याचा मोठा प्रवाह डोंगरावरून सोबत डोंगरच घेऊन वेगाने गावात आला . “जा तुझी सागराला मिळण्याची इच्छा पूर्ण कर , आणखी फार काळ मी तुला अडवू शकत नाही . वरून राजाने सह्याद्रीत उगम पावणाऱ्या झऱ्याला आदेश काढला . कान बधीर करणारा घोंगावू लागला . मुसळधार पावसाळा सुरवात झाली . समुद्राला भेटण्याच्या ओढीने झरा वाहू लागला . हा झरा एवढा बेभान वाहत होता की अख्खा डोंगरच सोबत नेण्याचा बेत केला . त्याच अवस्थेत त्या डोंगरातून वाहणाऱ्या झऱ्याने क्षणात होत्याचे नव्हते केले . या वाडीतील कुटूंबाच्या कुटुंब उध्वस्त या झाऱ्याने केली. ज्या घरात हसती खेळती मुले होती , भविष्याचा विचार करत गप्पा ठोकत बसलेले आई वडील होते , आपल्या औषधांचा डोस घेत असलेले ज्येष्ठ नागरिक होते . उद्या जेवायला काय करायचे असा प्रश्न पडलेल्या महिला होत्या त्या घरात आता फक्त आणि फक्त चिखल होता . ज्यांना या धोक्याचा इशारा समजला होता आपला संसार देवावर सोडून सैरा वैरा पळू लागले . पण जे पळू शकले नाहीत ते त्या चिखलात अडकले . रात्री अंधारात काहीच समजत नव्हते . कोण कुठे काय करतोय हे देखील कळण्यास मार्ग नव्हता . जो पर्यंत सूर्यदेव दर्शन देत नाही तोपर्यंत काहीच मदत करता येत नव्हती . निसर्गाच्या प्रकोपामुळे सारेच हतबल होते . दिवस उजाडला आणि त्या उजेडात जे दिसू लागले ते कधीच कोणाला दिसू नये असे होते .पाण्याच्या ओढ्यात वाहून गेलेली चिखलात अडकून खाली कुठं तरी पडली होती . काही घरातच चिखलात रुतून राहिली होती . काही त्या चिखलातच दबून राहिली होती . जे दिसत होते त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न होत होते . दिसले त्यांना बाहेर काढले गेले . काही ठिकाणी फक्त आवाज येत होता पण माणसे दिसत नव्हती . त्यांना आवाजावर शोधण्याचा प्रयत्न झाला . एनडीआरएफच्या तुकड्या रवाना झाल्या . त्यांच्या मदतीने शोध कार्य सुरु झाले . जे मिळाले ते आपले या आशेने ग्रामस्थ आशेवर होते. पण शोध कार्य सुरू असताना 12 जण चिखलात अडकल्याचे समजले. त्यामध्ये काही महिला,ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले होती. त्यामध्ये सहा जणांना वाचवण्यात यश आले. मात्र सहा जण मृतावस्थेत आढळून आले. त्यात सात वर्ष आणि नऊ वर्षांच्या लहान मुलांचा समावेश होता. गाव अक्षरशः हुंदके देऊ लागला.ते सर्व सावरून घरातील चिखल देखील काढायचा होता. तो काढायलाच त्यांना दिवस मोजावे लागले. गावाकडे जाणारा रस्त्यावर असलेले नदीवरील पूलच निकामी झाल्याने मदत कार्य देखील नीट पोहोचत नव्हते. मदतीसाठी तीन ते चार किलोमीटर पायी चालत जावे लागत होते. नावात साखर असलेले गाव पण निसर्ग त्यांच्यासोबत इतका कडू कसा वागला असेल? सुतारवाडी असल्याने ज्याने विश्वकर्मा चे मंदिर गावात आहे. ज्या विश्वकर्माने स्वर्ग लोकाचे, सोन्याच्या लंकेचे,हस्तिनापूर सारख्या भागाची निर्मिती केली त्याचे पूजक असलेला सुतार समाज ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिकाणी गाव आज आकार आकारशून्य झाले. आज शासनाकडून त्यांना मदत मिळत आहे. पण हे गाव आता विस्थापित होणार आहे. त्यासाठी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. ऐन गणेशोत्सव तोंडावर आला असताना त्यांना हे गाव सोडावे लागणार आहे. शासनाने जरी हा निर्णय सर्व विचारांती घेतला असेल पण या घटनेला एक महिना उलटला. त्यांना तात्पुरत्या निवासाची सोय शासन करू शकले नाही. त्यामुळे काही कुटुंब आजू बाजूच्या गावात, तालुक्याच्या ठिकाणी भाडेतत्त्वावर राहण्यास गेली आहेत. नागरिकांकडून जी मदत येते ती अशा कुटुंबांना मिळतच नाही. या गावाचा उदरनिर्वाह बहुतकरून शेतीवर देखील होता पण शेतात सुद्धा चिखलच झाल्याने पुन्हा याठिकाणी पीक निघेल याची शक्यता कमी आहे. जेएसडब्लू कंपनीने दोन कंटेनर तात्पुरत्या निवासासाठी दिले खरे पण त्यात नाही वीज,पाणी ना बाथरूमची सोय. याचाच आढावा घेण्यासाठी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती याठिकाणी पोहोचली. या ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यांना कसे झाले इतकेच विचारले आणि त्या सत्तरीतील आजी बाईंच्या डोळ्यातून अश्रू तरळू लागले. समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, सरचिटणीस विशाल मनोहर सावंत, कार्याध्यक्ष केवल महाडिक, प्रसिद्धीप्रमुख संतोष सुतार, सनीप कलोते, ओंकार महाडिक यांनी त्या ग्रामस्थांना बोलते केले. या बोलण्याच्या ओघात आमच्यासोबत ज्या व्यक्ती संपूर्ण वाडी फिरवून माहिती देत होती त्याच व्यक्तीचे सात आणि नऊ वर्षाचे मुलगा मुलगी या दुर्घटनेत गेले असल्याचे समजले आणि आम्हाला धक्काच बसला. तेवढ्यात एकाने दुस-याची पत्नी गेल्याचेही सांगितले. दुःख कितीही असले तरी जगण्यासाठी कठोर व्हावंच लागतं.ते झालेत. पण त्यांना गरज आहे ती शासनाकडून जी जागा आणि घरे दिली जातील ती सर्व सुविधांयुक्त असण्याची. अन्यथा त्यांच्या भावनांशी खेळण्यासारखे होईल.याबाबत पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती शासनाकडे पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा करणार असून त्यांना खारीचा वाटा म्हणून जीवनावश्यक वस्तूंची मदत समितीने पोहोचवली आहे .कुशीत वसलेले ,निसर्गाचे वरदान लाभलेले छोटसे पण टुमदार गाव . गाव कसले ३०-३५ घरांची वाडीचा ती . पोलादपूर तालुक्याच्या ठिकाणापासून १५ ते २० किमीच्या अंतरावर महाबळेश्वर मार्गावर हे गाव आहे . २१ जुलै ला जी ढगफुटी झाली ती ढगफुटी भागात झाली की काय असा प्रश्न पडतो . गावाला लागूनच सह्याद्रीच्या डोंगर रांगा असल्याने गावातून डोंगरावरून येणारे झऱ्याचे पाणी वाहते . कोणाला स्वप्नात देखील वाटले नसावे तसे त्या रात्रीत घडले . रात्री ८ ते ८.३० च्या दरम्यान या गावातील लोक जेवायला बसले होते . लहान मुले खेळण्यात व्यस्त असतील. त्याच दरम्यान पाण्याचा मोठा प्रवाह डोंगरावरून सोबत डोंगरच घेऊन वेगाने गावात आला . “जा तुझी सागराला मिळण्याची इच्छा पूर्ण कर , आणखी फार काळ मी तुला अडवू शकत नाही . वरून राजाने सह्याद्रीत उगम पावणाऱ्या झऱ्याला आदेश काढला . कान बधीर करणारा घोंगावू लागला . मुसळधार पावसाळा सुरवात झाली . समुद्राला भेटण्याच्या ओढीने झरा वाहू लागला . हा झरा एवढा बेभान वाहत होता की अख्खा डोंगरच सोबत नेण्याचा बेत केला . त्याच अवस्थेत त्या डोंगरातून वाहणाऱ्या झऱ्याने क्षणात होत्याचे नव्हते केले . या वाडीतील कुटूंबाच्या कुटुंब उध्वस्त या झाऱ्याने केली. ज्या घरात हसती खेळती मुले होती , भविष्याचा विचार करत गप्पा ठोकत बसलेले आई वडील होते , आपल्या औषधांचा डोस घेत असलेले ज्येष्ठ नागरिक होते . उद्या जेवायला काय करायचे असा प्रश्न पडलेल्या महिला होत्या त्या घरात आता फक्त आणि फक्त चिखल होता . ज्यांना या धोक्याचा इशारा समजला होता आपला संसार देवावर सोडून सैरा वैरा पळू लागले . पण जे पळू शकले नाहीत ते त्या चिखलात अडकले . रात्री अंधारात काहीच समजत नव्हते . कोण कुठे काय करतोय हे देखील कळण्यास मार्ग नव्हता . जो पर्यंत सूर्यदेव दर्शन देत नाही तोपर्यंत काहीच मदत करता येत नव्हती . निसर्गाच्या प्रकोपामुळे सारेच हतबल होते . दिवस उजाडला आणि त्या उजेडात जे दिसू लागले ते कधीच कोणाला दिसू नये असे होते .पाण्याच्या ओढ्यात वाहून गेलेली चिखलात अडकून खाली कुठं तरी पडली होती . काही घरातच चिखलात रुतून राहिली होती . काही त्या चिखलातच दबून राहिली होती . जे दिसत होते त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न होत होते . दिसले त्यांना बाहेर काढले गेले . काही ठिकाणी फक्त आवाज येत होता पण माणसे दिसत नव्हती . त्यांना आवाजावर शोधण्याचा प्रयत्न झाला . एनडीआरएफच्या तुकड्या रवाना झाल्या . त्यांच्या मदतीने शोध कार्य सुरु झाले . जे मिळाले ते आपले या आशेने ग्रामस्थ आशेवर होते. पण शोध कार्य सुरू असताना 12 जण चिखलात अडकल्याचे समजले. त्यामध्ये काही महिला,ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले होती. त्यामध्ये सहा जणांना वाचवण्यात यश आले. मात्र सहा जण मृतावस्थेत आढळून आले. त्यात सात वर्ष आणि नऊ वर्षांच्या लहान मुलांचा समावेश होता. गाव अक्षरशः हुंदके देऊ लागला.ते सर्व सावरून घरातील चिखल देखील काढायचा होता. तो काढायलाच त्यांना दिवस मोजावे लागले. गावाकडे जाणारा रस्त्यावर असलेले नदीवरील पूलच निकामी झाल्याने मदत कार्य देखील नीट पोहोचत नव्हते. मदतीसाठी तीन ते चार किलोमीटर पायी चालत जावे लागत होते. नावात साखर असलेले गाव पण निसर्ग त्यांच्यासोबत इतका कडू कसा वागला असेल? सुतारवाडी असल्याने ज्याने विश्वकर्मा चे मंदिर गावात आहे. ज्या विश्वकर्माने स्वर्ग लोकाचे, सोन्याच्या लंकेचे,हस्तिनापूर सारख्या भागाची निर्मिती केली त्याचे पूजक असलेला सुतार समाज ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिकाणी गाव आज आकार आकारशून्य झाले. आज शासनाकडून त्यांना मदत मिळत आहे. पण हे गाव आता विस्थापित होणार आहे. त्यासाठी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. ऐन गणेशोत्सव तोंडावर आला असताना त्यांना हे गाव सोडावे लागणार आहे. शासनाने जरी हा निर्णय सर्व विचारांती घेतला असेल पण या घटनेला एक महिना उलटला. त्यांना तात्पुरत्या निवासाची सोय शासन करू शकले नाही. त्यामुळे काही कुटुंब आजू बाजूच्या गावात, तालुक्याच्या ठिकाणी भाडेतत्त्वावर राहण्यास गेली आहेत. नागरिकांकडून जी मदत येते ती अशा कुटुंबांना मिळतच नाही. या गावाचा उदरनिर्वाह बहुतकरून शेतीवर देखील होता पण शेतात सुद्धा चिखलच झाल्याने पुन्हा याठिकाणी पीक निघेल याची शक्यता कमी आहे. जेएसडब्लू कंपनीने दोन कंटेनर तात्पुरत्या निवासासाठी दिले खरे पण त्यात नाही वीज,पाणी ना बाथरूमची सोय. याचाच आढावा घेण्यासाठी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती याठिकाणी पोहोचली. या ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यांना कसे झाले इतकेच विचारले आणि त्या सत्तरीतील आजी बाईंच्या डोळ्यातून अश्रू तरळू लागले. समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, सरचिटणीस विशाल मनोहर सावंत, कार्याध्यक्ष केवल महाडिक, प्रसिद्धीप्रमुख संतोष सुतार, सनीप कलोते, ओंकार महाडिक यांनी त्या ग्रामस्थांना बोलते केले. या बोलण्याच्या ओघात आमच्यासोबत ज्या व्यक्ती संपूर्ण वाडी फिरवून माहिती देत होती त्याच व्यक्तीचे सात आणि नऊ वर्षाचे मुलगा मुलगी या दुर्घटनेत गेले असल्याचे समजले आणि आम्हाला धक्काच बसला. तेवढ्यात एकाने दुस-याची पत्नी गेल्याचेही सांगितले. दुःख कितीही असले तरी जगण्यासाठी कठोर व्हावंच लागतं.ते झालेत. पण त्यांना गरज आहे ती शासनाकडून जी जागा आणि घरे दिली जातील ती सर्व सुविधांयुक्त असण्याची. अन्यथा त्यांच्या भावनांशी खेळण्यासारखे होईल.याबाबत पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती शासनाकडे पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा करणार असून त्यांना खारीचा वाटा म्हणून जीवनावश्यक वस्तूंची मदत समितीने पोहोचवली आहे .