श्री. बाळा मुंबईकर यांची उपमहानगर संघटक पदी व श्री. प्रदीप केणी यांची शिवसेना तळोजा शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
पनवेल/वार्ताहर:शिवसेना पक्ष प्रमुख सन्मानिय उद्धवजी बाळसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना नेते व संपर्क नेते कोकण विभाग सन्मानिय सुभाषजी देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख श्री. शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली श्री. बाळा मुंबईकर यांची उपमहानगर संघटक पदी व श्री. प्रदीप केणी यांची शिवसेना तळोजा शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. या वेळी शिवसेना तालुका संघटक भरत पाटील, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, यतीन देशमुख, आदि पदाधिकारी उपस्थित होते.