लॅपटॉप चोरी करणाऱ्या राजस्थान येथील गुन्हेगारास नवी मुंबई गुन्हे शाखा, कक्ष -२ कडुन अटक; ०७ गुन्ह्यांची उकल
पनवेल दि.06 (संजय कदम)- नवी मुंबई , मुंबई शहर , ठाणे व नवी दिल्ली या शहरामधील कोमा , विजय सेल्स , रिलायन्स डिजीटल , किंग्ज अशा इलेक्ट्रॉनिक शोरूममधुन डिसप्लेसाठी ठेववेल्या लॅपटॉपची चोरी करणाऱ्या राजस्थान येथील दोन गुन्हेगारास नवी मुंबई गुन्हे शाखा , कक्षा २ पनवेल यांनी अटक करून त्यांच्याकडुन एकुण १२,१०,३३७ / – रू किंमतीचे ०८ लॅपटॉप व गुन्ह्यात वापरलेली ऑल्टो कार हस्तगत केली. नमुद आरोपीकडुन एकुण ०७ लॅपटॉप चोरीचे गुन्हे उघडकीस आणले . अटक आरोपींची नावे धर्मसिंह चौथीलाल मिना , वय -३८ वर्षे , रा.ठि. पिलोदा , ता . गंगापुर , सवाई माधोपुर , राज्य – राजस्थान , आशिषकुमार रामहरी मिना , वय -२६ वर्षे , रा.ठि , रोशी , ता.नादौती , जि . करोली , राज्य – राजस्थान नवी मुंबई , मुंबई शहर व ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये असलेल्या कोमा , रिलायन्स डिजीटल , विजय सेल्स, किंग्ज अशा ईलेक्टॉनिक शोरूम मधुन डेमो साठी ठेवलेल्या लॅपटॉपची चोरी होण्याचे प्रकार घडले होते. अशाचप्रकारे एकाच दिवशी १७ ऑगस्ट २०२१ रोजी नवी मुंबई आयुक्तालयातुन काही तासाच्या अंतरामध्ये पनवेल शहरातील विजय सेल्स् व सीबीडी बेलापुर येथील कोमा इलेक्टॉनिक्स या शोरूममधुन डेमोसाठी ठेवलेले ०३ लॅपटॉप चोरी झाल्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे व सीबीडी बेलापुर पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद झाले होते . तसेच दिनांक १६ ऑगस्ट २०२१ रोजी या एकाच दिवशी बोरीवली पोलीस ठाणे मुंबईच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या अशा ०३ इलेक्टॉनिक शोरूमधुन ०३ लॅपटॉप व चितळसर मानपाडा पोलीस ठाणे , ठाणे शहर हद्दीतुन ०१ लॅपटॉप चोरी झाल्याबाबत असे एकुण ०४ गुन्हे नोंद झाले होते . तसेच नवी दिल्ली येथील निर्मान विहार येथुन ०१ लॅपटॉप चोरी झाल्याबाबतचा गुन्हा नोंद आहे . असे एकुण ०७ लॅपटॉप चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह, सह पोलीस आयुक्त जय जाधव, अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) , महेश घुर्ये , पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) , श्रीमती रूपाली अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) , विनोद चव्हाण , यांनी सदरचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबत पोलीस ठाणे व गुन्हे शाखेस आदेशीत केले होते . सदर गुन्ह्यांचा समांतर तपास नवी मुंबई गुन्हे शाखा , कक्ष र चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांचे नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक मानसिंग पाटील व पथक करीत असताना नमुद ०६ गुन्हे हे एकाच पध्दतीने केले असल्याचे दिसुन आले . त्यामुळे नमुद सर्व गुन्ह्यांच्या घटनास्थळावरील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक बाबींचा तपास केला असता नमुदचे गुन्हे हे एकाच आरोपीतांनी केले असल्याचे निष्पन्न झाले . सदरचे आरोपी हे राजस्थान येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. नमुदचे आरोपी हे राजस्थान येथुन मोटार कारने मुंबई , ठाणे , नवी मुंबई , नवी दिल्ली या शहरात जावुन तेथे असलेल्या वेगवेगळ्या इलेक्टॉनिक शॉपमध्ये ग्राहक म्हणुन लॅपटॉप खरेदीसाठी जात. शोरूमध्ये डिसप्लेसाठी ठेवण्यात आलेल्या लॅपटॉप पैकी ज्या लॅपटॉपला बीप पिन लावलेली नसेल असे लॅपटॉप तेथील कर्मचा – यांची नजर चुकवुन ते चोरी करून शोरुमधुन परागंदा होत असत. सदर आरोपींचा राजस्थान , दिल्ली या परिसरात गुन्हे शाखा , कक्ष २ , कडुन शोध घेण्यात आला . पंरतु नमुद गुन्हेगार हे अतिशय कावेबाज असल्याने ते वेगवेगळ्या ठिकाणी स्वःताचे अस्तित्व लपवुन गुन्हे करीत असत. नमुद गुन्ह्यातील आरोपी हे लॅपटॉप विक्री करण्यासाठी वाशी रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहीती गुन्हे शाखा , कक्ष २ चे पोलीस उप निरीक्षक मानसिंग पाटील यांना मिळाली. सदर ठिकाणी जावुन सापळा लावला असता नमुद गुन्ह्यातील दोन आरोपी हे मिळुन आले . नमुद आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असुन , नमुद आरोपींना पनवेल शहर पोलीस ठाणे गुर.नं. ४५३/२०२१ भादवि कलम ३८० , ३४ मध्ये दि . ०१ / ० ९ / २०२१ रोजी २२:१५ वाजता अटक करण्यात आली आहे . त्यांची दि .८ / ० ९ / २०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर झाली आहे. अटक आरोपीकडुन हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल खालीलप्रमाणे : नमूद आरोपीकडे सखोल तपासाकरीता त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मारूती सुझुकी ऑल्टो मोटार कार RJ – 45 – CP – 9308 ही हस्तगत करण्यात आली असुन , एकुण ०८ लॅपटॉप एकुण १२,१०,३२७ / – रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून , अटक आरोपींकडून उघडकीस आणलेल्या गुन्ह्यात पोलीस ठाणे गुन्हा रजि . क्रमांक 31 . क . 9 २ ३ पनवेल शहर पोलीस स्टेशन , नवी मुंबई सीबीडी पोलीस स्टेशन , नवी मुंबई बोरीवली पोलीस स्टेशन , मुंबई शहर बोरीवली पोलीस स्टेशन , मुंबई शहर बोरीवली पोलीस स्टेशन , मुंबई शहर चितळसर मानपाडा पोलीस स्टेशन , ४ गुर नं . क ४५३/२०२१ , भादवि कलम ३८०,३४ . गुर नं . १६०/२०२१ , भादवि कलम ३८० , ३४ गुर नं . ९ ६५ / २०२१ , भादवि कलम ३८०,३४ गुर नं . ९ ६६ / २०२१ , भादवि कलम ३८० , ३४ गुर नं . ९ ६७ / २०२१ , भादवि कलम ३८० , ३४ गुर नं . १८१/२०२१ , भादवि कलम ३८० , गुर नं . १११२/२०२१ , भादवि कलम ३८० , ३४ ५ ६ ठाणे शहर ७ निर्मान विहार पोलीस स्टेशन , दिल्ली • उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी : सदरच्या गुन्हयांच्या तपासादरम्यान वपोनि गिरीधर गोरे , सपोनि संदीप गायकवाड , पोउपनि मानसिंग पाटील , पोलीस उप निरीक्षक वैभव रोंगे , सफौ सुनिल सांळुके , सफौ . सुदाम पाटील , पोहवा १३३ ९ / ग्रंशात काटकर , पोहवा २७०० / सुनिल कुदळे , पोहवा ४२० / सचिन पवार , पोहवा १०३४ / ज्ञानेश्वर वाघ , पोहवा ४४ / तुकाराम सुर्यवंशी , पोह १३०६ / मनोज जानराव , पोहवा १७३२ / अनिल पाटील , पोहवा पोना २००५ / सचिन म्हात्रे , पोना २०८२ / इंद्रजित कानु , पोना २०२२ / रूपेश पाटील , पोना २३३४ / प्रफुल्ल मोरे , पोना १७३८ / दिपक डोंगरे , पोना ६६४ / सचिन पाटील , पोशि १२५ ९ ३ / संजय पाटील , पोशि ३५७७ / प्रविण भोपी यांनी कौशल्यपुर्ण उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. फोटोः गुन्हे शाखा कक्ष-2, पनवेलच्या पथकाने हस्तगत केलेले चोरीच्या 7 लॅपटॉपसह आरोपी