गणेशोत्सव २०२१ – आरती संग्रहाच्या पुस्तकाचे प्रकाशन.
उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )मनोज कोळी आणि कु. कल्पेश कोळी यांच्या संकल्पनेने गणेशोत्सवासाठी आरती संग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसेचे उलवे शहराध्यक्ष राहुल पाटील, तालुका उपाध्यक्ष निर्दोष गोंधळी, उलवे उपाध्यक्ष कु.आकाश देशमुख, उलवे सरचिटणीस अनिकेत ठाकुर, उलवे सचिव मनोज कोळी, गव्हाण विभाग अध्यक्ष तुषार म्हात्रे, गव्हाण विभाग उपाध्यक्ष कु.प्रितम तांडेल, वहाळ पंचायत अध्यक्ष कु.कल्पेश कोळी, विशाल भोईर, चेतन कोळी, सुनील कोळी, अमोल गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.विविध देवदेवतांची आरती यात असून भाविक भक्तांसाठी खूपच उपयोगी व महत्वाची असल्याचे सांगत जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी आरती संग्रहाच्या पुस्तकाचे कौतुक केले.