पनवेल शहर पोलीस ठाणे , नवी मुंबई पोलीस शिपायाचा अपघात घडवून सुपारी देवून खुन केल्याचे उघड
पनवेल/प्रतिनिधी:पनवेल शहर पोलीस ठाणे , नवी मुंबई पोलीस शिपायाचा अपघात घडवून सुपारी देवून खुन केल्याचे उघड ( महिला पोलीसासह इतर दोन आरोपी जेरबंद ) १ ) : दिनांक १५/०८/२०२१ रोजी २२:३० वाजण्याचे सुमारास पनवेल रेल्वे स्टेशन ते मालधक्का कडे जाणा – या रोडवर , भगत चाळीच्या समोर , मयत शिवाजी माधवराव सानप वय – ५४ वर्ष ( मुंबई पोलीस ) यांचा कोणत्यातरी अज्ञात वाहनाने ठोकर मारून अपघात केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने पनवेल शहर पोलीस ठाणे गुर नं . ४५२/२०२१ , भादवि कलम २७ ९ , ३३७ , ३३८ , ३०४ ( अ ) मोवा , का , कलम १८४ , १३४ ( अ ) ( ब ) अन्वये प्राणांकीत मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्हयात पोलीस अंमलदार मयत झाला असल्याने गुन्हयाची उकल होणेकरीता नवी मुंबईचे मा . पोलीस आयुक्त श्री . बिपीन कुमार सिंह , मा . पोलीस सह आयुक्त डॉ . जय जाधव , मा पोलीस उप आयुक्त श्री . शिवराज पाटील , परिमंडळ २ , पनवेल , मा . सहा . पोलीस आयुक्त श्री . भागवत सोनवणे यांनी विशेष सुचना देवुन मार्गदर्शन केले होते . २ ) गुन्हयाची उकल : गुन्हयाच्या अनुषंगाने मयत याची पत्नी व मेव्हणा यांनी मयत शिवाजी माधवराव सानप यांच्या मृत्युबाबत संशय व्यक्त केल्याने तसेच घटनास्थळाच्या परिसरातील सिसिटीव्ही फुटेज व घटनास्थळावरील साक्षिदार यांचेकडे केलेल्या सखोल तपासात अपघाताबाबत संशय निर्माण होत असल्याने मा . वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . अजयकुमार लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी / अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले . सदर गुन्हयाचे तपासात गुन्हयातील साक्षीदार याचेकडे केलेल्या सखोल तपासावरुन तसेच गुन्हयाचे घटनास्थळाचा परिसर , कुर्ला रेल्वे स्टेशन व पनवेल रेल्वे स्टेशन येथील सीसीटिव्ही फुटेज मधील पडताळणी केली असता दोन अनोळखी इसम पनवेल रेल्वे स्टेशन येथून लोकल ट्रेनने कुला रेल्वे स्टेशन येथे जावून तेथून पोलीस अमलदार शिवाजी माधवराव सानप याचा पाठलाग करीत पनवेल रेल्वे स्टेशन येथे लोकल ट्रेनने आले असल्याचे दिसून आले . त्यातील एका इसमास साक्षीदार धनराज राजेंद्र जाधव याने ओळखून त्याचे नाव विशाल बबनराव जाधव असे असल्याचे सांगून तो आरोपीत महिला शितल पानसरे हि राहत असलेल्या बिल्डींगच्या वॉचमनचा मुलगा असल्याचे सांगितले गुन्हयाचे तपासामध्ये संशयीत इसमाचे प्राप्त मोबाईल फोन नंबर व मयत याने ज्या मार्गाने प्रवास केला त्या मार्गावरील सीसीटिव्ही आणि इतर तात्रीक तपासाचे आधारे काढलेल्या माहिती वरुन , तसेच साक्षीदार धनराज जाधव याचेकडे केलेल्या सखोल तपासात शितल प्रकाश पानसरे , विशाल बबनराव जाधव व गणेश लक्ष्मण चव्हाण उर्फ मुदावथ यांनी घटनेच्या पुर्वी अनेक वेळा पनवेल परिसर , पनवेल रेल्वे स्टेशन परिसर व घटनास्थळाच्या आजुबाजुस आल्याचे आढळून आले . मयत शिवाजी माधवराव सानप हा पनवेल रेल्वे स्टेशन येथे उतरुन पायी जात असताना यातील आरोपीत १ ) विशाल बबनराव जाधव , २ ) गणेश लक्ष्मण चव्हाण उर्फ मुदावथ यांनी त्यांचे ताब्यातील नॅनो कारने जाणीवपूर्वक जिवे ठार मारण्याचे उद्देदशाने त्यांना जबर ठोकर मारुन गंभीर जखमा करुन त्यांचा खुन केला असल्याचे दिसून आले आहे . आरोपीत यांनी गुन्हयात वापरलेली नॅनो कार ही निर्जनस्थळी घेवून जावून जाळून पुरावा नष्ट केला आहे . तसेच गुन्हा करताना आरोपी यांनी त्यांचे अंगावरील कपडे फेकुन दिले आहेत .
३ ) गुन्हयाचा हेतु : नमुद गुन्हयातील मयत इसम व आरोपी महिला पोलीस शिपाई शितल पानसरे हे मुंबई येथे एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने एकमेकांना ओळखत होते . त्यांचेत त्यावेळी झालेल्या वादाचा मनात राग धरुन सुड घेण्याचे उददेशाने आरोपी शितल पानसरे हिने तिचे घरात घरकाम करणारा विशाल जाधव व त्याचा मित्र गणेश चव्हाण यांना पैसे देवून त्यांची मदत घेवून पोना शिवाजी सानप यास जिवे ठार मारण्याचा कट कारस्थान रचून तो पनवेल रेल्वे स्टेशन येथे उतरुन पायी जात असताना त्यास यातील आरोपीत १ ) विशाल जाधव , २ ) गणेश चव्हाण उर्फ मुदावथ यांनी त्याचे ताब्यातील नॅनो कारने जाणीवपुर्वक जिवे ठार मारण्याचे उद्देदशाने जबर ठोकर मारुन त्यांना गंभीर जखमा करुन त्यांचा खुन केला आहे . आरोपीत महिला हिने मयत पो.ना. शिवाजी सानप यांचे विरोधात खालील प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत . ) सीबीडी पो ठाणे गुन्हा रजि नंबर १५ / २०१ ९ भादवि ३५४ , ३५४ ( ड ) , ५० ९ , ५०४ , ३२३ , ५०६ ( २ ) प्रमाणे ( सद्यस्थिती – मा न्यायालयात दोषारोप पत्र सादर – न्यायप्रविष्ठ ) ) विष्णूनगर पोलीस ठाणे , पोलीस आयुक्तालय , ठाणे गुन्हा रजि नंबर । ३३१ / २०१ ९ भादवि ३७६ , ३५४ ( सी ) ( डी ) , १५०६ ( २ ) , ३२३ , ५०४ प्रमाणे ( सद्यस्थिती – बी समरी मंजुरीकरीता अहवाल सादर केला आहे . ) यातील मयत पो.ना शिवाजी सानप याला धडा शिकविण्यासाठी आरोपीत महिला हिने धनराज जाधव याचेशी ईन्स्टाग्राम वरून ओळख करून ४ दिवसात घाईने लग्न केले . लग्नानंतर थोडयाच दिवसात आरोपीत महिला हिने धनराज जाधव याला पो.ना. शिवाजी सानप याला जीवे ठार मारण्यासाठी दबाव टाकला , परंतु धनराज जाधव याने त्यास नकार दिल्याने आरोपीत महिला हिने त्याचे विरोधात देखिल खालील प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे . १ ) आरसीएफ पोलीस ठाणे , मुंबई गुन्हा रजि नंबर । १८०/२०२१ भाददि २ ९ ४ , आयटी अॅक्ट ६६ ई प्रमाणे ( सद्यस्थिती – तपास चालू आहे ) ४ ) अटक आरोपींची नावे व पत्ते : पोलीस ठाण्यात वेगवेगळी पोलीस तपास पथके तयार करुन आरोपी गणेश लक्ष्मण चव्हाण उर्फ मुदावथ यास तेलंगणा येथून ताब्यात घेतले आहे . तसेच आरोपी शितल प्रकाश पानसरे व विशाल बबनराव जाधव यांना त्यांचे राहते घर उलवे येथून ताब्यात घेवून त्यांना दिनांक गुन्हयात अटक करण्यात आले आहे . १. शितल प्रकाश पानसरे वय २ ९ वर्षे , राहणार – सिध्दीसाई रेसिडन्सी , रूम नं . १०४ , प्लॉट नं . १ ९ ५ , सेक्टर नं . ०१ , उलवे , नवी मुंबई मुळ राह . मु.पो. जाकोरी , ता . संगमनेर , जि . अहमदनगर २. विशाल बबनराव जाधव , वय १८ वर्षे , राहणार – रूम नं . ४०२ , प्लॉट नं .२०३ , दुर्वांकुर बिल्डींग , सेक्टर नं . ०३ , उलवे नोड , नवी मुंबई मुळ राहणार – पडसी बुद्रुक , ता . खामगांव , जि . बुलढाणा ३. गणेश लक्ष्मण चव्हाण उर्फ मुदावथ , वय २१ वर्षे , राहणार मु . गोडगोडा तांडा , ता . परधी , जि . विकाराबाद , तेलंगणा . ४ ) गुन्हयात हस्तगत माल : १ ) १५,००० / रु . किमतीचा रेडमी कपनीचा गडद रंगाचा मोबाईल फोन , त्यात एअरटेल कंपनीचे दोन सिमकार्ड २ ) ५,००० / रु . किमतीचा इंटेल कंपनीचा गडद निळ्या रंगाचा मोबाईल फोन , त्यात एअरटेल कंपनीचे सिमकार्ड ३ ) ५,००० / रु किमतीचा ओपो कंपनीचा AIK मॉडेलचा मोबाईल ५ ) तपास पथक : श्री . अजयकुमार लांडगे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , पनवेल शहर पोलीस ठाणे , पोनि श्री विजय कादबाने , पोनि श्री . संजय जोशी , सपोनि श्री देवळे , सपोनि , श्री हुलगे , सपोनि श्री पवार , सपोनि श्री दळवी , पोउपनि श्री फरताडे , पोहवा / १ ९ राउत , पोहवा / ९ ३५ वाघमारे , पोहवा / १३७८ गथडे , पोना / २०६८ म्हात्रे , पोशि / १२०४४ खेडकर , पोना / २२३ ९ राठोड , पोना / ३०६७ राउत , पोना / ३२३ ९ पारासुर , पोना / २ ९ २७ साळूखे , पोना / २८३१ देशमुख , पोना / ९९ पाटील नमुद गुन्हयाचे मुळापर्यंत जावून अतिउत्कृष्ट तपास करुन चांगली कामगिरी केली असून , सदर गुन्हयाच्या कटामध्ये आणखी कोण सामील आहेत याचा नवी मुंबई पोलीस शोध घेत आहेत ,