बेकायदेशीर विनापरवाना मिठाई व फरसान कारखाना चालू केल्याबद्दल उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.बेकादेशीर चालू असलेला मिठाई व फरसाण कारखाना बंद करण्याचे प्रकाश ठक्कर यांची मागणी.
उरण दि 18(विठ्ठल ममताबादे )उरण शहरात असलेल्या बाजारपेठेतील मुन्सिपल घर क्रमांक 202 तसेच 204 येथे चालू असलेला मिठाई कारखाना त्वरित बंद करून होणारी संभाव्य हानी टाळणे याबाबत तक्रार अर्ज उरण पोलीस ठाण्यात देण्यात आला होता. चौकशी अंती वरिष्ठाच्या आदेशाप्रमाणे 10/9/2021 रोजी गैरअर्जदार यांच्या विरोधामध्ये उरण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 267/2021 भादविस कलम 285 प्रमाणे 10/ 9/2021 रोजी कायदेशीररित्या उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की उरण बाजारपेठेत फुल मार्केटला लागून घर क्रमांक 202 व 204 ही रहिवाशी मिळकत आहे. सदरचे इमारत हे श्रीमती मनिबेन ठक्कर, चंद्रकांत ठक्कर,उमाकांत ठक्कर,प्रकाश ठक्कर यांच्या नावे आहे. मात्र या ठिकाणी घर क्रमांक 202 व 204 या ठिकाणी बेकायदेशीर व नियमबाह्य पेढे बर्फी फरसाण बनविण्याचा कारखाना चालू आहे. याबाबत कारखाना चालवणाऱ्या चंद्रकांत ठक्कर यांच्या विरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ज्या ठिकाणी हा कारखाना चालू आहे ती इमारती निवासी इमारत आहे. तळमजल्यावरील जागेचा वापर व्यवसायासाठी करण्याची नगरपरिषद चे कोणतेही रीतसर परवानगी घेतली गेलेली नाही.सदर जागेचा वापर व्यवसायासाठी करत असलेले त्याचे घरपट्टी आकारणी निवासी इमारती या दराने होत असल्याने नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान होत आहे. सदरच्या इमारतीस पाणीपुरवठा घरगुती वापरासाठी दिले असताना सध्याचा पाण्याचा वापर व्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत असताना नगर परिषदेचे आर्थिक नुकसान होत आहे. सदरचा कारखाना चालविण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेतली गेलेली नाही. त्यासाठी कुटुंबातील कोणत्याही सदस्यांची परवानगी घेतलेली नाही. महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत अधिनियम 1965 चे कलम 280, 281 अन्वये ज्वलंत पदार्थाचा साठा ठेवणे बाबत मर्यादा सदरच्या कलमाने घातली असून त्याचा सर्रास पणे येथे भंग होत आहे. अग्निशमन दलाचे परवानगी आवश्यक असूनही ते घेण्यात आलेली नाही.डायरेक्टर ऑफ एक्सप्लॉजीव्ह यांचीसुद्धा परवानगी सिलेंडर घेण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी घेतलेली नाही. सदरचे मिठाई तयार करण्याचा कारखाना हा भर बाजारपेठेत वर्दळीच्या रस्त्यावर असून त्यामुळे कधीकाळी सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली तर नगर परिषदेकडे आग प्रतिबंधक व्यवस्था नाही त्यामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी,मालमत्ता हानी होण्याचा संभव आहे.सदरच्या कारखान्याला जोडून असलेल्या जागेत कुटुंब राहत असल्यामुळे प्रकाश ठक्कर यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.या जागेत शॉप इंस्पेक्टरचे लायसेन्स नाही.तरी येथे रोज बर्फी पेढे फरसाण बनविण्याचे काम दररोज चालू आहे.उरण पोलीस ठाण्यात सदर बेकायदेशीर व नियमबाह्य कामाविरोधात तक्रार, अर्ज देऊनही तसेच गुन्हा नोंदवुनही चंद्रकांत ठक्कर यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होत नसल्याने प्रकाश ठक्कर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
मोठ्या प्रमाणात आता व्यवसाय वाढल्याने सदर कारखाना इतरत्र हलवावा व संभाव्य धोका टाळावा यासाठी प्रकाश ठक्कर यांनी त्यांचे मोठे भाऊ चंद्रकांत ठक्कर यांना विनंती केली असता चंद्रकांत ठक्कर यांनी प्रकाश ठक्कर यांना उडवा उडवीची उत्तरे दिली.चंद्रकांत ठक्कर हे आमचे मोठे भाऊ असून आमच्या कुटुंबातील वाद टाळण्यासाठी आम्ही आज पर्यंत शासन दरबारी तक्रार केली नव्हती. कारखाना बंद होत नसल्याने किंवा कारखाना इतर ठिकाणी हालत नसल्याने नाईलाजाने लेखी तक्रार करणे भाग पडले असे तक्रारदार प्रकाश ठक्कर यांनी यावेळी सांगितले. नियमबाह्य व बेकायदेशीरपणे चालू असलेला सदर कारखाना त्वरित बंद करावा किंवा इतर ठिकाणी हलवावा अशी मागणी तक्रारकर्ते प्रकाश ठक्कर यांनी केली आहे.नियमबाह्य व बेकायदेशीरपणे चालू असलेल्या हा कारखाना पोलीस प्रशासन, उरण नगर परिषद, अन्न व औषध प्रशासन विभाग का बंद करत नाही असा सवाल आता थेट जनतेतून विचारला जाऊ लागला आहे. उद्या जर या ठिकाणी दुर्घटना झाली आणि कोणाच्या जीवाचे बरे वाईट झाले तर या घटनेला जबाबदार कोण ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
कोट (चौकट )-कारखान्याशी संबंधित वाद हा आमच्या कुटुंबातील अंतर्गत वाद आहे. मात्र प्रकाश ठक्कर यांनी त्यांच्या स्वार्थासाठी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. माझ्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाची रीतसर परवानगी आहे.आमचे कोणतेही काम बेकायदेशीर किंवा नियमबाह्य नाही.
-चंद्रकांत ठक्कर