टर्पेंटाईन ऑईलचे अपहार करून त्याची बेकायदा विक्री करणाऱ्या पाच जणांविरूद्ध तालुका पोलिसांनी केली कारवाई
पनवेल, दि.20 (वार्ताहर)- टर्पेंटाईन ऑईलचे कुठून तरी अपहार करून ते तालुक्यातील अजिवली येथे काश्मिर बॉंबे कॅरियर याठिकाणी घेऊन येऊन ते कंटेनर टॅंकमध्ये इलेक्ट्रीक मोटारच्या सहाय्याने प्लॅस्टिक ड्रममध्ये काढून घेऊन त्याची विक्री करणाऱ्या पाच जणांविरूद्ध पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून जवळपास 2,15,000,00 रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तालुक्यातील शेडूंग येथे काश्मिर बॉंबे कॅरियरच्या गाळ्यात मोहम्मद मुमताज अलि सय्यद (वय-47), साहिब अजाब (कुलदीप) सिंग (वय-43), राजेंद्र सुलखन सिंग (वय-40), परमजीत सिंग मख्खनसिंग तारा (वय-51), नामदेव सावंत (वय-55) हे मिळून सदर ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत कंटेनर ट्रकमध्ये असलेले 54.950 टन टर्पेंटाईन ऑईलचे कुठून तरी अपहार करून त्याठिकाणी काढत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वपोनि रविंद्र दौंडकर यांना मिळताच त्यांनी पोलिस उपायुक्त शिवराज पाटील व सहा पोलिस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश खेडकर, पोलिस उपनिरीक्षक आकाश पवार, सहा पोलिस निरीक्षक तुकाराम कोरडे, पोलिस शिपाई सुनिल खेरनार आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून 5 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूद्ध भादंवि कलम 406,34 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955चे कलम 3,7,8 सह महाराष्ट्र सॉल्वंट, रेफीनेट एन्ड स्लोप (लायसनिंग) ऑर्डर 2007 प्रमाणे कारवाई केली आहे.टर्पेंटाईन ऑईलचे अपहार करून त्याची बेकायदा विक्री करणाऱ्या पाच जणांविरूद्ध तालुका पोलिसांनी केली कारवाई
पनवेल, दि.20 (वार्ताहर)- टर्पेंटाईन ऑईलचे कुठून तरी अपहार करून ते तालुक्यातील अजिवली येथे काश्मिर बॉंबे कॅरियर याठिकाणी घेऊन येऊन ते कंटेनर टॅंकमध्ये इलेक्ट्रीक मोटारच्या सहाय्याने प्लॅस्टिक ड्रममध्ये काढून घेऊन त्याची विक्री करणाऱ्या पाच जणांविरूद्ध पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून जवळपास 2,15,000,00 रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तालुक्यातील शेडूंग येथे काश्मिर बॉंबे कॅरियरच्या गाळ्यात मोहम्मद मुमताज अलि सय्यद (वय-47), साहिब अजाब (कुलदीप) सिंग (वय-43), राजेंद्र सुलखन सिंग (वय-40), परमजीत सिंग मख्खनसिंग तारा (वय-51), नामदेव सावंत (वय-55) हे मिळून सदर ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत कंटेनर ट्रकमध्ये असलेले 54.950 टन टर्पेंटाईन ऑईलचे कुठून तरी अपहार करून त्याठिकाणी काढत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वपोनि रविंद्र दौंडकर यांना मिळताच त्यांनी पोलिस उपायुक्त शिवराज पाटील व सहा पोलिस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश खेडकर, पोलिस उपनिरीक्षक आकाश पवार, सहा पोलिस निरीक्षक तुकाराम कोरडे, पोलिस शिपाई सुनिल खेरनार आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून 5 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूद्ध भादंवि कलम 406,34 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955चे कलम 3,7,8 सह महाराष्ट्र सॉल्वंट, रेफीनेट एन्ड स्लोप (लायसनिंग) ऑर्डर 2007 प्रमाणे कारवाई केली आहे.