आ.राजूदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूना ब्लॅंकेट व खाऊ वाटप.
उरण दि 26(विठ्ठल ममताबादे )
दिनांक 26/9/2021 रोजी मा.राजसाहेब ठाकरे यांच्या अंत्यत जवळचे विश्वासु , निष्ठावंत दोन शिलेदार आमदार राजुदादा पाटील आणि सचिन मोरे या दोन्ही समाजसेवी व्यक्तिमत्व असलेल्या नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण यांच्या वतीने उरण उपतालुकाध्यक्ष सत्यवान भगत ,विभाग अध्यक्ष दिपक पाटील यांच्या आयोजनाने उरण येथील रानसई मार्गाचीवाडी येथे आदिवासी कुटूंबियांना ब्लॉकेट ,टॉवेल आणि मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. ह्या कार्यक्रमासाठी मराठी कामगार सेनेचे उपाध्यक्ष संदेश भाई ठाकूर , मनसे उपतालुकाध्यक्ष सत्यवान भगत ,उपतालुका अध्यक्ष राकेश भोईर , रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक रितेश पाटील , विभाग अध्यक्ष दिपक पाटील ,एड.ओमकार पाटील, भार्गव म्हात्रे , ठाकूर , शेखर म्हात्रे , मेनन म्हात्रे ,नामदेव बरतोड, संजोग माळी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. सदर कार्यक्रम हा अशा आदिवासी बांधवांसाठी आयोजित केला होता की ज्यांना खरोखरच कोणत्याही प्रकारची मदत पोचत नाही.ज्या ठिकाणी जाण्यासाठी जीवाची पराकष्टा करावी लागते.ज्या दुर्गम भागात येण्या जाण्यासाठी पक्की रस्ते नाहीत कोणत्याही प्रकारचे सुविधा नाहीत अश्या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची गरज ओळखून हा कार्यक्रम मार्गाची वाडी रानसई चिरनेर या ठिकाणी आयोजित केला .या कार्यक्रमाला गावातील लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.त्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद होता.गावातील विजय शिंगवा या तरुणाने सर्वांना धन्यवाद दिले. “आपण मनसेचे सर्व पदाधिकारी सदस्य या ठिकाणी आलात आणि ब्लॅंकेट देऊन या बांधवांना मायेची ऊब दिलीत त्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी राहू.आपल्या टीमच्या सर्व सदस्यांना निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना.ही वाडी डोंगरात आहे. आणि येथे यायला-जायला खूपच त्रास आहे तरी आपण आमच्या वाडीवर आलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार” या शब्दात तेथील आदिवासी बांधवांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.