आदई ग्रामपचायत मध्ये बसविण्यात आले सीसी टीव्ही कॅमेरे साप्ताहिक रायगड पनवेलचे संपादक संतोष भगत, मनोहर पाटील यांच्या मागणीला यश २०१८ साली केली होती मागणी.
पनवेल / प्रतिनिधी ( SB )आदई हे गाव पनवेल शहरानजीक आहे त्यामुळे पनवेल शहराप्रमाणेच या गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे .
आता या गावाचे स्वरुप पूर्णपणे बदललेले आहे. उंचच उंच इमारती या ठिकाणी उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे गावचे गावपण हरवले आहे. पूर्वी गावामध्ये प्रत्येक जण प्रत्येकाला ओळ्खयचा मात्र आता या गावचा इतका विस्तार झाला आहे की कोणीच कोणाला ओळ्खेनासे झाले आहे . ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्याप्रमाणे परिसरातील गुन्हेगारी ही वाढते. आदई गावातही गुन्ह्यांचे ही प्रमाण वाढले आहे. त्या मुळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये सी सी टीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे यासाठी साप्ताहिक रायगड पनवेलचे संपादक संतोष भगत, कार्यकारी संपादक मनोहर पाटील यांनी २०१८ रोजी एका निवेदनाद्वारे आदई ग्रामपंचायतकडे मागणी केली होती. त्या वेळेस लग्न सराई सुरू होती. अनेक महिला दाग दागिने घालून लग्नाला जात आसतात . मात्र आता या महिला सुरक्षित रहातील.
पोलिसांमध्ये आता कितीही गुन्ह्यांची नोंद केली तरी आता गुन्हेगार पकडणे शक्य होईल, आता आदई मध्ये ठीक ठिकाणी सी सी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत आता गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना मदत होणार आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतल्याने आता काळजी करण्याची गरज नाही. गेल्या काही वर्षांपूर्वी लग्नाला निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील लाखो रुपयांचे गळ्यातील मंगळसुत्र खेचून आरोपी फरार झाल्याची घटना घडली होती. आता या अशा घटनांमुळे महिला व मुलींमध्ये भीतीचे वातावरण राहणार नाही. आता आदई गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्या मुळे महिला व मुली बिंधास्तपणे पणे फिरू शकतात . त्याच प्रमाणे आदई गावांमध्ये ठीक ठिकाणी बांधकाम सुरू असल्याने बांधकाम मटेरिअल चोरी होण्याचे प्रणाम वाढले होते मात्र, आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने गुन्हे उघडकीस आणण्यात खांदेश्वर पोलिसांना यश येईल. म्हणून आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने गुन्हेगारीवर अंकुश बसेल अशी आशा सर्वांना आहे.