पत्रकार मित्र असोसिएशन व राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे शितोळे कुटुंबियांना मदतीचा हाथ !
पनवेल / प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील विचुंबे येथील ज्ञानेश्वर माउली को ऑप. हौसिंग सोसायटी येथील रिक्षाचालक कै. दत्तात्रेय शितोळे यांचे नुकतेच अकस्मात निधन झाले त्यांच्या निधनानंतर शितोळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने अनेक संकटे शितोळे कुटुंबियां समोर उभी राहिली मानसिक व आर्थिक परिणामांना शितोळे कुटुंबीय सामोरे गेले. याबाबत पनवेलमधील पत्रकार मित्र असोसिएशन व राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी तात्काळ शितोळे कुटुंबियांना जीवनाश्यक वस्तू व आर्थिक स्वरूपाची मदत शितोळे यांच्याघरी जाऊन केली व त्यांचे सांत्वन देखील केले तसेच यानंतर देखील कोणतीही अडचण आल्यास आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे आश्वासन देखील दिले. यावेळी कोकण संध्याचे संपादक व जेष्ठ पत्रकार दिपक महाडिक, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक, समाजसेविका नूरजहाँ कुरेशी, पत्रकार संतोष आमले, राजे प्रतिष्ठानचे तालुका सचिव राकेश मोरे, दादासाहेब घालमे, कविता बनसोडे, वनिता मांजरेकर, प्रदीप धोत्रे, सीताराम पवार, सतीश रणखांबे आदी उपस्थित होते.