संशयितरित्या घुटमळणाऱ्या दोघा इसमांविरूद्ध कारवाई
पनवेल दि.03 (वार्ताहर)- संशयितरित्या घुटमळणाऱ्या दोघा इसमांविरूद्ध पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
तालुक्यातील अजिवली येथील ब्रीजखाली गुन्हा करण्याच्या इराद्याने संशयितरित्या घुटमळणाऱ्या राजकुमार विश्वकर्मा (वय-29) तसेच कसळखंड आष्टे लॉजिस्टीकच्या भींतीलगत घुटमळणारा शहताब महताब खान (वय-30) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरूद्ध म.पो.का. कलम 122 (क) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.