बहुचर्चित लफडं या सिनेमात दिसणार उरण-भेंडखळ गावचा सुपुत्र विपुल प्रकाश भोईर.
उरण दि २८(विठ्ठल ममताबादे )
महेश थोरात यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या लफडं या चित्रपटाचे पोस्टर लॉन्चिंग व कलाकार परिचय यासंदर्भात एक शानदार कार्यक्रम रविवार २४ ऑक्टोबर रोजी संपन्न झाले
यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील झालेत व पोस्टर अनावरण सोहळा पार पडला तसेच लफडं या चित्रपटाच्या कलाकारांचा परिचय देखील झाला. लफडं या चित्रपटात उरण तालुक्यातील भेंडखळ गावचे सुपुत्र विपुल प्रकाश भोईर हा एका चांगल्या भूमिकेत दिसणार आहे व विपुल याने या अगोदर बऱ्याच फिल्म केल्या असून त्याने लफडं या फिल्म साठी धुळे या शहरात ऑडिशन दिले व त्यात त्याची निवड झाली लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण विविध ठिकाणावर होणार आहे या चित्रपटात बहुतांशी कलाकार हे नवोदित असून चित्रपटाचे दिग्दर्शक महेश थोरात हे असून निर्माता महेश थोरात व श्रीमती सीमा साखरकर हे आहेत तसेच असोसिएट दिग्दर्शक सचिन बिऱ्हाडे हे करणार असून गीत संगीत नितीन-प्रसाद टीम यांचा असेल तसेच प्रॉडक्शन श्री चेतन सोनार व भटू चौधरी हे बघणार आहेत लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण होऊन हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्यास सज्ज होत आहे .
महाराष्ट्रातील तमाम रसिकप्रेक्षकांना विनम्र विनंती आहे की हा चित्रपट आपण सर्वांनी नक्कीच चित्रपट गृहात जाऊन बघावा असे आवाहन महेश थोरात फिल्म प्रोडक्शन व श्रीमती सीमा साखरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे