सह्याद्री प्रतिष्ठानचे एक पाऊल शिक्षणाकडे.
उरण दि 5(विठ्ठल ममताबादे )सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुरस्कृत सह्याद्री विद्यार्थी अकादमी अंतर्गत एक पाऊल शिक्षणाकडे या उपक्रम अंतर्गत सह्याद्री विद्यार्थी अकादमी पनवेल विभागातर्फे पनवेल तालुक्यातील गाडेश्वर या गावातील 60 विद्यार्थ्यांना दिवाळी भेट म्हणून वह्या, पेन, पेन्सिल, रबर अश्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सह्याद्री विद्यार्थी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष अतुल पडवळ यांनी स्वीकारले. या कार्यक्रमास लक्ष्मीबाई बळीराम झुगरे (ग्रुपग्रामपंचायत सदस्या वाजे),
बळीराम अलू झुगरे, रामदास झुगरे ( माजी ग्रामपंचायत सदस्य वाजे), हरिश्चंद्र भगत,सामाजिक कार्यकर्ते वामन हिंदोळा, ग्रामस्थ उपस्थित होते तसेच रितेश कदम, गौरव दरवडा, संदेश सांगडे, मयूर टकले, राकेश पाटील, देवन ठाकूर, आदेश पाडेकर, अक्षय भोईर, सुधीर पवार, करण म्हात्रे, अजय आदईकर,सोहम नाईक,विवेकानंद गायकर,हर्षद चौधरी,सुनील सोनवणे,मितेश नेरुलकर,हर्षद चौधरी, अमेय भगत, रमेश, हरेश, चंद्रकांत फडके व रामा भगत हे विद्यार्थी सेवक व दुर्गसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन ठाकूर यांनी केले. वामन हिंदोळा यांनी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा सहयाद्री विद्यार्थी अकादमीने हा एक छोटासा प्रयत्न केला.