पतीने केली पत्नीस चाकूने दुखापत
पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः पत्नीने नवीन मोबाईल घेवून न दिल्याचा राग मनात धरुन पतीने तिला शिवीगाळ करून तिच्या डाव्या हाताच्या मनगटावर किचनमधील चाकूने मारुन तिला दुखापत केल्याची घटना डेरवली गावात घडली आहे.
या ठिकाणी राहणारे कुणाल साठवणे (29) याला पत्नीने नवीन मोबाईल घेवून न दिल्याचा राग मनात धरुन पतीने तिला शिवीगाळ करून तिच्या डाव्या हाताच्या मनगटावर किचनमधील चाकूने मारुन तिला दुखापत केल्याची घटना घडल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.