श्री नारायणबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून निराधार व विधवा महिलांना मदतीचा हात
पनवेल, दि.11 (संजय कदम) ः पनवेल शहरातील सुप्रसिद्ध अशा श्री साई नारायणबाबा मंदिरातील श्री नारायणबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून परिसरातील निराधार व विधवा महिलांना आज धान्याचे वाटप करण्यात आले.
या चॅरिटेबल ट्रस्टचे रामलाल चौधरी तसेच दुबई येथील नारायणबाबा भक्त अजुन आसवानी यांच्यामार्फत 140 महिलांना धान्याचे वाटप करण्यात आले. दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या संस्थेमार्फत साई मंदिरातून अशा प्रकारे महिलांना वाटप करण्यात येते. यासाठी त्यांच्या रेशनकार्डची नोंद करण्यात येते. तसेच शालेय विद्यार्थ्यांना दररोज मोफत दुध व नाष्टा, शिक्षण, औषध याचे वाटप करण्यात येते. या संस्थेच्या माध्यमातून अनेक जणांची सामुहिक विवाह येथे लावण्यात आले आहेत. तसेच कोरोना काळामध्ये शासनाला आर्थिक मदत सुद्धा केली आहे. त्याचप्रमाणे राममंदिर उभारणीसाठी आ.प्रशांत ठाकूर यांच्याकडे या संस्थेने धनादेश सुपूर्द केला आहे. विविध सामाजिक उपक्रम या संस्थेमार्फत सातत्याने राबविण्यात येत असल्याने हे मंदिर म्हणजे हजारो गोरगरीबांचे आशास्थान बनले आहे.
फोटो ः श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून निराधार व विधवा महिलांना धान्य वाटप